आरोग्य
सवंदगाव येथे…या हॉस्पिटलचे मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथे कोपरगाव येथील श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल व ग्रामपंचायत सवंदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सर्वरोग निदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.सदर शिबिरामध्ये अनुभवी तज्ञ डाँक्टरांकडून मार्गदर्शन,सल्ला व आवश्यकता असंल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
सदर शिबिरात श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये महात्मा जोतिबा फुले या योजनेत बसणारे सर्व आजाराचे निदान मोफत केले या हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात.त्याचा नागरिक लाभ घेत आहेत.
सदर शिबिरामध्ये बी.पी.२ डी इको,ई.सी.जी तपासणी,शुगर,एजिओप्लास्टी,एंजिओग्राफी, मोफत औषधे,बायपास या तपासण्या मोफत केल्या एकूण शिबिरा मध्ये ३५१ रुग्णांची नोंद झाली असून निष्पन्न झालेल्या रुग्णांवर हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये महात्मा जोतिबा फुले या योजनेत बसणारे सर्व आजाराचे निदान मोफत केले या हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात.
नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन मोफत केले जाते.हॉस्पिटलमध्ये स्टार हेल्थ,आय.सी.सी.पॉलिसी कॅशलेस सेवा उपलब्ध आहे.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजचे तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी शिबिरातील रुग्णांच्या सेवेसाठी होते.बाकी हॉस्पिटलचा परिचारिका स्टाफ उपस्थित होता.या शिबिरासाठी मार्केटिंगचे,उत्तम भागवत व लोहकने यांनी अथक परिश्रम घेतले. यात नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रशांत.सगळगीळे,अस्थिरोगत तज्ञ डॉ.राहुल पारधे,पठाण सर,डॉ.शशांक तुसे उपस्थित होते .