जयंती,पुण्यतिथी अभिवादन
गौतम बुद्ध समस्त मानवतेला मिळालेले वरदान-..यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गौतम बुद्धांचा धम्म हा कुठल्या एका विशिष्ठ समाजाचा उद्धार करण्याचा मार्ग नव्हे,तर समस्त मानवतेला मिळालेले ते वरदान आहे.त्यामुळे बुद्धविहार हे केवळ धार्मिक केंद्र न राहता बुद्धविहार हे संस्कार केंद्र झाली पाहिजेत असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव ताल उक्यात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“बुद्धाच्या विचारांची समाजाला गरज असून गावोगावी असलेले बुद्धविहार यांच्याकडे फक्त धार्मिक केंद्र म्हणून पाहणे योग्य नाही.या बुद्धविहाराच्या माध्यमातून भावी पिढीला आदर्श संस्कार दिले गेले पाहिजे व हि सर्व बुद्धविहारे संस्कार केंद्र झाली पाहिजे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,साईबाबा संस्थान शिर्डी.
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील ‘तक्षशिला बुद्धविहार’ उदघाटन सोहळा व बुद्धप्रतिरूप स्थापना’ कार्यक्रम नुकताच ना. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अॅड.बी.के.बर्वे,विक्री कर विभागाचे उपायुक्त दिलीप झाल्टे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,साहित्यिक गंगाधर आहिरे,सूर्यभान घेगडमल,त्र्यंबकराव भोसले,विनोद आहिरे,अॅड.भास्करराव गंगावणे,दिलीप वाबळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मेहेरखांब,माजी पंचायत समितीच्या माजी सभापती पौर्णिमा जगधने,सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर आदींसह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लॉक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे हे आपले भूषण आहे.आपल्या देशाला सर्वच स्तरावर संपन्न करण्यासाठी सर्व समाज एक विचाराने एकत्रित राहणे हि काळाची गरज आहे.त्यासाठी बुद्धाच्या विचारांची समाजाला गरज असून गावोगावी असलेले बुद्धविहार यांच्याकडे फक्त धार्मिक केंद्र म्हणून पाहणे योग्य नाही.या बुद्धविहाराच्या माध्यमातून भावी पिढीला आदर्श संस्कार दिले गेले पाहिजे व हि सर्व बुद्धविहारे संस्कार केंद्र झाली पाहिजे ते समाजाच्या आणि आपल्या देशाच्या हिताचे असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मेहेरखांब यांनी केले तर सुत्रसंचलन अड्.गंगावणे यांनी तर उपस्थितांचे आभार सरपंच शशिकांत वाबळे यांनी मानले आहे.