जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

कोपरगावातील…या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे लक्षवेधी यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील विद्यार्थीनीनी ‘संकल्प २०२२’ च्या विविध स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव

या सर्व विद्यार्थीनींना परीक्षक प्रो.डॉ.प्रगतीसिंग,डॉ.गावित्रे व सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच सांधिक सहभागाबद्दल के.जे.सोमैया महाविद्यालयाला सांधिक पारितोषिक ही प्राप्त झाले आहे.

संजिवनी आर्ट,कॉमर्स व सायन्स महाविद्यालय कोपरगावच्या बी.बी.ए.आय.बी.विभागाच्या वतीने दि. २८ व २९ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन संकल्प २०२२ या विविध स्पर्धा नुकत्याच आयोजित अकरण्यात आल्याच होत्या त्या वेळी या विद्यार्थीनींनी हे यश संपादीत केले आहे.

यामध्ये भित्ती पत्रक,जाहिरात निर्मिती,चेहरा पेंटींग,व्यक्तीमत्व विकास,प्रश्न मंजूषा अशा विविध स्पर्धेचे आयोजन या वेळी करण्यात आलेले होते.यामध्ये जाहिरात निर्मिती या स्पर्धेत जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या ७ ग्रुप ने आपला सहभाग नोंदविला होता.या ग्रुपमधुन के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या ग्रुपने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितांनाच विवाह संस्कार पद्धतीची झलक यामधून दाखविली होती.तसेच चेहरा पेंटींग या स्पर्धेत जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या ५ ग्रुप ने सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी देशप्रेमाचे दर्शन घडवून श्रोत्यांची मने जिंकली व प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामध्ये महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील विद्यार्थीनी कु.शुभांगी निकुंभ,कु.वैष्णवी मगर, कु.कोमल गागरे,कु.वैष्णवी कर्डिले,कु.रूत्विका चिनके,कु.श्रद्धा देवकर यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थीनींना परीक्षक प्रो.डॉ.प्रगतीसिंग,डॉ.गावित्रे व सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच सांधिक सहभागाबद्दल के.जे.सोमैया महाविद्यालयाला सांधिक पारितोषिक ही प्राप्त झाले आहे.

विद्याथीनींनी मिळविलेल्या या यशामध्ये विभागातील प्रा.आकाश पवार (विभाग प्रमुख),प्रा.योगेश चौधरी,प्रा.पुजा गखखड,प्रा.प्रज्ञा कडू,प्रा.मिलीता वंजारे,प्रा.धिरज माळी,प्रा.उर्मिला आहिरे,प्रा.शगुना गव्हाळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होत असते.मायक्रोबायोलॉजी विभागाने मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॅड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ.विजय ठाणगे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थीनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल परीसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close