जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात झुलेलाल जयंती उत्साहात साजरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सिंधी समाजाचे ईष्टदैवत भगवान झुलेलाल (वरुणदेव) यांची जयंती कोपरगावात मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात दोन दिवस साजरी करण्यात आली आहे.
आयोलाल झुलेलालच्या जयघोषात बुधवारी सिंधी समाजाचे आराध्य दैवत असून भगवान झुलेलाल यांची १०७२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रभात फेरी यासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कोपरगावच्या वतीने धार्मिक भजन प्रस्तुत करण्यात आले व नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
सिंधी समाजाच्या वतीने गेल्या ५८ वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो.यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष तुलसीदास खुबानी व श्री व सौ.निखिल खूबानी यांच्या हस्ते विधिवत झुलेलाल देवतेची स्थापना करण्यात आली.तदनंतर सिंधी समाज महिला मंडल कोपरगावच्या वतीने धार्मिक भजन प्रस्तुत करण्यात आले व नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्री व सौ.गौरव शर्मा व श्री व सौ.दिनेश वालीरामानी यांच्या हस्ते सत्यनारायण पुजा करण्यात आली.त्यानंतर शहरातील विघ्नेश्वर चौक येथे प्रसाद वाटप करण्यात आला आहे.यावेळी युवा मंच अध्यक्ष अमित शर्मा,गोपी शर्मा,मुकेश शर्मा,जीतु शर्मा,सनी वालीरामानी,राम आर्य,श्याम आर्य,धीरज कराचीवाला,हर्षल कृष्णणी,विशाल शर्मा,आयुष शर्मा,अजय कृष्णणी,विनोद शर्माआदि कार्यकर्ते हज़र होते.
दुपारी भंडारा देण्यात आला तदनंतर महिला,पुरुष व लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या सदरिल सर्व कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडल अध्यक्ष सौ.नेहा कराचीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या यावेळी सर्वश्री शालिनी खुबानी,हेमा खुबानी, मानसी आर्य,सिमरन खुबानी,रेणु कृष्णानी, मनीषा कृष्णानी, कीर्ती कृष्णानी, आशा आर्य,गुंजन आर्य,वर्षा आर्य,मंजु शर्मा,काशिश शर्मा, पूजा शर्मा,बीना वलीरामनी,प्रीति राजपाल,कविता, दीपा वलीरामनी,सावित्री सचदेव,नीतू कराचीवाला,कंचन कृष्णानी, आदि महिला हजर होत्या.
सदरिल स्पर्धा पार पडल्यानंतर धार्मिक कार्यक्रम होवून झुलेलाल देवतेच्या ज्योतीचे विसर्जन शहरातील गोदावरी नदी पात्रात करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे चेतन खुबानी,मनोहर कृष्णानी, रिंकु खुबानी, हरेश आर्य,हरेश कराचीवाला,विकी शर्मा,अमित शर्मा,हरेश शर्मा,दिलीप नोतवानी,राम आर्य,सुंदर आर्य आदिनी परिश्रम घेतले आहे.
समाजाचे जेष्ठ तुलसीदास खुबानी,टेकचंद खुबानी,सतीश कृष्णानी, मोहन कराचीवाला, भागचंद शर्मा,मामा राजपाल आदिनी संगमनेर व शिर्डी येथून आलेल्या सिंधी बांधवांचे स्वागत केले.रात्री उशीरा कार्यक्रम समारोप करण्यात आला आहे.