शैक्षणिक
सोमैया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान-गौरव

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपण सोमैया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचाही अभिमान वाटला.याच महाविद्यालयात शिकून मी गेली ४७ वर्षे एस.बी.आय.व इतर सहकारी बँकांमध्ये उच्च पदावर नोकरी करत आहे.याचे सर्व श्रेय या महाविद्यालयाला असल्याचे प्रतिपादन के.जे.सोमैया महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष बापूसाहेब घेमूड यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनीष कोठारी सावळीविहिर ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक जमदाडे,माजी मॅनेजर नगर अर्बन बँकचे माजी व्यवस्थापक एस.पी.कुलकर्णी, साईबाबा मंदिर प्रमुख मोहनराव कोते,महाराष्ट्र राज्य माहेश्वरी समाज संघाचे राज्य सचिव दिलीप डागा,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप अरगडे,वारकरी संप्रदाय नगर जिल्हा प्रमुखराजू रक्ताटे,श्री व्यास सर,नानासाहेब गव्हाणे,अनुप गिरमे,सुधीर डागा,प्रा.डॉ.लहू गायकवाड,सारिका पाठक,ऍड.राजाराम लोहकरे,उद्योजक पंकज लोढा,निकेतन आढाव,प्राचार्य अनिता थोरात,आदिनाथ ढाकणे,पंकज शिंदे,इरफान पठाण,राहाता पंचायत समितीचे उपसभापती उमेश जपे,अनील गिते,विलास बगाटे,रामदास गव्हाणे,प्रा.अनिल मते, अमोल चिने,प्रा.डॉ.दादासाहेब डांगे,सविता परदेशी,किरण पवार,संभाजी नाईक,महेंद्र घारे,विक्रम शिंदे यांचेसह बहुसंख्य माजी विद्यार्थी,प्राध्यापक वृंद,कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयासाठी पंकज लोढा यांनी ५१ हजार,अनुप गिरमे यांनी २१ हजार,तर श्री व्यास सर यांनी ११ हजार १११,अनुप गिरमे यांनी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे तर ऍड.राजाराम लोहकरे यांनी विविध शासकीय तसेच निमशासकीय एजन्सीच्या माध्यमातून मोठा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”आज सोमैया महाविद्यालयात कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम,सात विषयांची संशोधन केंद्रे सुरू आहेत ही आम्हा माजी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूपच आनंदाची आणि विस्मयकारक बाब आहे.महाविद्यालयाची ही नेत्रदीपक प्रगती बघून अभिमान वाटतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी विद्यार्थी संघाचे सचिव नितीन डोंगरे म्हणाले की,”कोपरगाव तालुका आणि परिसरात समाजाशी नाळ जोडलेले सोमैया महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे.आजच्या या मेळाव्याने आम्ही खरोखर भारावून गेलो आहोत.या महाविद्यालयाने अनेक मोठमोठे उद्योजक,अभियंता,कंत्राटदार,डॉक्टर,वकील,शिक्षक,प्राध्यापक आदी नोकरदार तसेच समाजकारणी व राजकारणी देखील घडविले आहेत ही उल्लेखनीय बाब आहे.आज महाविद्यालयाने नेत्रदीपक प्रगती केली आहे,तरी देखील महाविद्यालयाची वास्तू आता जुनी झाली आहे.महाविद्यालयातचे कार्यक्षेत्र आता वाढलेले आहे.त्यामुळे महाविद्यालयावर आर्थिक बोजा देखील वाढला आहे.अशा परिस्थितीत आपण माजी विद्यार्थ्यांनी मिळून महाविद्यालयासाठी किंवा किमान इथे शिकणाऱ्या गरीब,गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन या महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करू असे मला मनोमन वाटते.”
सदर प्रसंगी पंकज लोढा यांनी ५१ हजार,अनुप गिरमे यांनी २१ हजार,तर श्री व्यास सर यांनी ११ हजार १११,अनुप गिरमे यांनी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे तर ऍड.राजाराम लोहकरे यांनी विविध शासकीय तसेच निमशासकीय एजन्सीच्या माध्यमातून मोठा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रोहन यादव यांना विज्ञान विषयातील पेटंट प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.मेळाव्याची सुरुवात माजी विद्यार्थी संघाच्या लोगोचे अनावरण तसेच स्वरांजली या ऍक्टिव्ह व्हॉइस ग्रुपच्या अनिल गिड्डे,कु.लावर,कु.गोरे,शेंदुर्णीकर,बर्डे प्रा.निळेकर आदी सहकऱ्यांच्या संगीताने झाली.तर विनायक रक्ताटे या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्याच्या मिश्कील भाषणाने मेळाव्याची सांगता झाली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.शैलेंद्र बनसोडे व प्रा.डॉ.जिभाऊ मोरे यांनी केले तर गोदावरी संघाचे माजी मॅनेजर मातेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.