कोपरगाव तालुका
तापमान वाढीचा शेतीवर प्रातिकूल परिणाम-…या तज्ज्ञांचा इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वातावरणातील बदल शेतीत दिवसेंदिवस हानिकारक ठरत आहेत.अति थंडी,अति पर्जन्य आणि आता तापमान वाढ यामुळे शेती तील अडचणी येणाऱ्या काळात वाढतील असे संशोधन सातत्याने पुढे येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कीड तज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी नुकतेच केले आहे.
‘सनबर्न’ वर शाश्वत नियंत्रण मिळवण्यासाठी भाजीपाला पिकांसाठी पॉलिहाऊस शेडनेट चा वापर फायदेशीर ठरू शकतो. तसेच पेपर मलचिंग क्रॉप कव्हर या तंत्रज्ञानाचा देखील अलीकडे जागृत व प्रगतिशील शेतकरी करत आहेत.याचा वापर जास्तीत जास्त भविष्यात करावा लागेल”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,कीटक तज्ञ.
त्यांनी आपल्या प्रसिद्धी प्रत्रकात म्हटले आहे की,”जास्त तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत चालला आहे.त्यामुळे जमीन अधिक कोरडी होत चालली आहे.याचा फटका शेतीतील मित्र जीवाणू कमी होण्यावर दिसून येत आहे.दिवसेंदिवस तापमान असेच वाढत राहिल्यास जमिनीतील,’मायक्रो फ्लोरा’ कमी होऊन पिकाचे नैसर्गिक पोषण होण्यामध्ये अडचणी निर्माण होतील आणि त्याचाच परिणाम थेट उत्पादन घटिवर होणार आहे.
खरंतर शेतीचे उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय पदार्थ मातीती ची योग्य पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पूरक मित्र जिवाणू हे चक्र होय.वाढत्या तापमानामुळे हे विस्कळीत होईल.
सध्या फळ पिकांमध्ये ‘सनबर्न’चा धोका वाढत असून त्यामुळे फळांमध्ये चट्टे पडत आहेत फळे आतून काळपट पडून गुणवत्तेवर परिणाम होताना दिसत आहे.तसेच शेल्फ लाइफ फळांचे कमी होत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानावर पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे वाटते.
उपायोजना
‘सनबर्न’ वर शाश्वत नियंत्रण मिळवण्यासाठी भाजीपाला पिकांसाठी पॉलिहाऊस शेडनेट चा वापर फायदेशीर ठरू शकतो. तसेच पेपर मलचिंग क्रॉप कव्हर या तंत्रज्ञानाचा देखील अलीकडे जागृत व प्रगतिशील शेतकरी करत आहेत.याचा वापर जास्तीत जास्त भविष्यात करावा लागेल.
वाढीच्या अवस्थेतील फळांची सन बर्न पासून नियंत्रण करण्यासाठी अश्वमेध ग्रुप ने सिलिकॉन २००३ मध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच लॉन्च केले होते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला . हे तंत्रज्ञान पुढे आले तसेच सिलिकॉनचा वापर जगाच्या पाठीवर ‘सनबर्न’ साठी होत असून भारतातील फळ शेतीला वाढत्या तापमानात सिलिकॉन वरदान ठरले आहे.फवारणीद्वारे सिलिकॉन अडीच ग्रॅम प्रति लिटर आठ दिवसाच्या अंतराने फवारणी केल्यास सनबर्न वरती फायदा होऊ शकतो.द्राक्ष डाळिंब केळी संत्रा मोसंबी लिंबू त्याच बरोबर टरबूज आणि खरबूज या फळपिकांमध्ये देखील सिलिकॉन प्रभावी उपाय म्हणून शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे.सिलिकॉन चा वापरामुळे बुरशी व कीड नियंत्रणात देखील मदत होत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.