कोपरगाव तालुका
कर्मवीर काळे कारखान्याचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात १ लाख ९९ हजार ७१९ टन उसाचे गाळप केले असल्याचे प्रतिपादन या कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी नुकत्याच संपलेल्या गळीत हंगाम २०१९-२० च्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभाच्या वेळेस केले आहे.
त्यावेळी त्यांनी देश पातळीवरील व राज्य पातळीवर साखर उद्योगाचे आकडेवारी सांगून या उद्योगाचा आढावा घेतला.व आगामी काळात कारखान्याची यंत्रणा आता कालबाह्य झाली असून ती बदलावी लागणार असल्याचे सभासदांचे निदर्शनास आणून आगामी काळात एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा गळीत हंगाम २०१९-२० चा सांगता समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सदर प्रसंगी कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आ. अशोक काळे,कारखान्याचे संचालक नारायण मांजरे,ज्ञानदेव मांजरे,कारभारी आगवान,सचिन रोहमारे,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे,संजय आगवन,सचिन चांदगुडे,एम.टी. रोहमारे,बाजार समितीचे संचालक मधुकर टेके,कार्यकारी संचालक गिरीश जगताप,ताकवणे,श्री गारगुटे, शेतकी अधिकरी श्री कापसे,सचिव डी. व्ही. आभाळे बाबा सय्यद, सोमनाथ गोंडाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी उसाची एफ.आर.फी.किमंत २ हजार ३९२ रुपये येत असली तरी आपण आतापर्यंत २ हजार ५०० रुपयांचा दर दिला असल्याचे सांगून तो अद्याप अंतिम नसल्याचे सांगून अंतिम ऊस दर गुलदस्त्यात ठेवले आहे.यंदा देशात चाळीस टक्के साखर निर्मिती कमी होणार आहे.पहिला साठा हा १४५ लाख टन शिल्लक असून पुढील वर्षीही हा साठा १०६ लाख टन राहील तर परदेशात साखर ६० लाख टनाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे.कच्या साखरेला २ हजार ०४० रुपये दर मिळाला असल्याचे सांगितले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,या वर्षी उसाची मोठ्या प्रमाणावर टंचाई होती.मात्र तरीही कारखान्याने बाहेरून १ लाख ६५ हजार २७० टन ऊस आणून कारखाना चालवला असून त्यातून ३ लाख ९४ हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे.साखर कारखान्याला या वर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे साखर उतारा १०.८० इतका आला असल्याचेही त्यांनी सांगून त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.व गत हंगामापेक्षा हा उतारा जास्त असल्याचे नमूद केला आहे.या वर्षी बहुतांशी ऊस चाऱ्यासाठी वापरला गेला होता.बाहेरील उसापैकी बहुतांशी ऊस हा नाशिक,निफाड, आदी ठिकाणाहून आणला असल्याचे सांगून पुढील वर्षी सुरु उसाची अडचण राहणार नाही मात्र आडसाली उस मात्र बाहेरून आणावा लागेल याचे सुतावाच केले आहे.यंदा सुदैवाने पाऊस चांगला झाला असल्याने उन्हाळी आवर्तने मिळणार आहेत.त्यामुळे सात नंबर फॉर्म भरून शेतकऱ्यांनी उसाला पाण्याची नोंद जलसंपदा विभागाकडे करावी व ठिबक सिंचनाचा वापर करावा असे आवाहन केले आहे.
या वेळी गाळप हंगामासाठी ज्या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले त्यांचा कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव केला आहे.व त्यांच्या कार्याची गंभीर दाखल घेतली आहे.दरम्यान त्यांनी आपल्या भाषणा दरम्यान पी.जी.चव्हाण नावाच्या अधिकाऱ्यांशी सवांद साधण्याचा प्रयत्न केला असता ते खुर्चीत डुलक्या मारत असल्याचे निदर्शनात आले.नजीकच्या अधिकाऱ्याने त्यांना जागे केल्याने सभेत हाश्याचे फवारे उडाले.
कोपरगाव तालुक्याच्या राजकारणावर राजकीय भाष्य करताना त्यांनी पाच वर्षात आपल्याला सरकार विरुद्ध संघर्ष करावा लागला याची आठवण करून दिली आहे.तत्कालीन लोकप्रतिनिधीने काम केले नसल्याचा आरोप केला.नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला बहुमताने निवडून दिले.त्यामुळे तालुक्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण काम करत असून अधिवेशनात अनेक प्रश्न मार्गी लावले आहे.अनेक प्रश्नाबाबत आपण मंत्र्यांना भेटत असून कामे मार्गी लावण्यासाठी आपण कार्यरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली आहे.रस्त्याला आपण २१.३० कोटींचे रस्ते मंजूर केल्याचे सांगितले आहे.गत सरकारात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार असताना त्यांनी कोपरगाव साठवण तलाव,शेती पाणीप्रश्न, शेतीचे रखडलेले अनुदान,वन्य प्राण्यांचा बंदोबस्त आदी प्रश्नांची दाखल घ्यायला भाग पाडल्याचे सांगून माजी आ. कोल्हेचे नाव न घेता त्यांच्या निष्क्रियतेवर टीका केली आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे सचिव सुनील कोल्हे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले.