कोपरगाव तालुका
कोपरगावात आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील साई गाव पालखी सोहळा मुंबादेवी तरूण मंडळ,साई बालाजी बिर्ला आय हॉस्पिटल,अशोका मेडिकेअर आणि जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संयुक्त विद्यमाने व्यापारी धर्मशाळा येथे नेत्र तपासणी उपचार व हृदय रोगांवर तपासणी उपचार शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.त्याला रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती शहरातील उद्योजक कैलास ठोळे यांनी दिली आहे.
समाजातील गरजू लोकांना उपचाराचे दर परवडत नसल्याने कोपरगाव शहरात साई गाव पालखी सोहळा मुंबादेवी तरूण मंडळ,साई बालाजी बिर्ला आय हॉस्पिटल,अशोका मेडिकेअर आणि जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संयुक्त विद्यमाने व्यापारी धर्मशाळा येथे नेत्र तपासणी उपचार व हृदय रोगांवर तपासणी उपचार शिबिराचे आयोजन मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष विजय बंब यांच्या हस्ते पार पडले आहे.