जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात मूकबधिर महिलेवर बलात्कार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या देर्डे चांदवड ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या मूकबधिर २८ वर्षीय मजुरी करणाऱ्या मुलीवर अल्पसंख्यांक आरोपी याने मंदिराजवळून काटवणात ओढत नेऊन सदर महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.

सदर महिला हि दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सौचास गेली असता तिच्या पाळतीवर असलेला अल्पसंख्यांक आरोपी हा तिच्या पाठोपाठ फोनवर बोलण्याचे नाटक करत गेला व फिर्यादीजवळ जाऊन तिला धमकावुन मंदिराकडून ओढत काटवनात नदीजवळ नेऊन तिला धक्का बुक्की करून तिचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड येथील रहिवासी असून ती मजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालविते.तिला बोलता येत नसून ती मूकबधिर आहे.तर आरोपी हा त्याच गावातील व फिर्यादी महिलेच्या घरा जवळ राहणारा आहे.

सदर महिला हि दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सौचास गेली असता तिच्या पाळतीवर असलेला अल्पसंख्यांक आरोपी हा तिच्या पाठोपाठ फोनवर बोलण्याचे नाटक करत गेला व फिर्यादीजवळ जाऊन तिला धमकावुन मंदिराकडून ओढत काटवनात नदीजवळ नेऊन तिला धक्का बुक्की करून तिचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला आहे.

दि.२५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी व एक साक्षीदार मुलगी या बरोबर सौचास जात असताना सकाळी ०९ वाजण्याच्या सुमारास आरोपी मजकूर हा फिर्यादी माहिलेजवळ आपल्या दुचाकीवरून आला व तिचे जवळून दुचाकी घेतली व फिर्यादिसह साक्षिदार मुलींबरोबरही बोलून निघून गेला होता.त्या नंतर फिर्यादीचे रात्री घरात भांडण झाले.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी कोपरगाव लायन्स क्लब मुकबधिर विद्यालय येथील शिक्षिक व शिक्षिका,आई,महिला अंमलदार यांचे समक्ष जबाब दिल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक जाधव,स.पो.नि.आव्हाड आदींनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी गु.र.क्रं.६३/२०२२ भा.द.वि.कलम ३७६,३२३,५०६ प्रमाणे आरोपी विरूद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close