कोपरगाव तालुका
गोदावरी कालव्यांचे पाणी शुद्धच,वावड्या उठवू नये-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हरित लवादाने गोदावरी नदीच्या पाण्याबाबत अहवाल दिला आहे कालव्याच्या पाण्याबाबत नाही.कोपरगाव शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी दररोज मिळावे यासाठी ना.आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.मात्र कुठलाही सबंध कुठे जोडून पसरविला जाणारा गैरसमज अत्यंत दुर्दैवी असून येणाऱ्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनाने शुद्ध नसणाऱ्या विरोधकांनी वावड्या उठवू नये असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते विरेन बोरावके यांनी विरोधकांना केले आहे.
“पडणाऱ्या पावसाचे पाणी राज्यातील धरणात साठविले जावून कालव्यांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करूनच विविध शहरातील नागरिकांना पुरविले जाते.त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या नागरिकांना देखील दारणा धरणातून कालव्याच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रातुनच आजवर पाणी पुरवठा होत आहे व यापुढे देखील होईल.आजवर येणारे पाणी कालव्यातूनच येत होते व यापुढेही कालव्यातूनच येणार आहे.गोदावरी नदीतून येणार नाही”-विरेन बोरावके,माजी गटनेते कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आजवर ज्यांनी आपली राजकीय पोळी भाजून कोपरगाव शहरातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले त्यांचे मनसुबे ना.आशुतोष काळे यांच्यामुळे उधळले गेले आहेत.कोपरगाव शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२३ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे.त्याचबरोबर कोपरगाव शहरासाठी असलेल्या ५.९६ एम.एल.डी.पाणी आरक्षित होते.कोपरगाव शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेवून त्यामध्ये वाढ करून ना.काळे यांनी ३.३६ एमएलडी वाढीव पाणी आरक्षित करून घेतले आहे.हि विरोधकांची खरी पोटदुखी असून आपले आजवरचे पाण्याचे राजकारण संपुष्टात येण्याची देखील भीती विरोधकांना असल्याचे विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.
पाण्याच्या प्रश्नाबाबत आजी माजी आ.काळे किती संवेदनशील आहे हे कोपरगावसह जिल्ह्याला ठावूक आहे.त्यामुळे कधीही कोठेही कुणावर अन्याय होणार नाही.सर्वाना समान न्याय देण्याची भूमिका आजवर काळे परिवाराने घेतली आहे.त्यामुळे जिथे पाण्याचा प्रश्न तिथे काळे परिवार असे समीकरण कोपरगाव शहर व तालुक्यातील जनता जाणून आहे.मात्र ज्यांना वर्षानुवर्षांपासून पाण्यावर राजकारण करायचे आहे त्यांना येणारी कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर दिसत आहे.आजवर आपल्या खोट्या आश्वासनाला बळी पडलेली कोपरगावची जनता या निवडणुकीत बळी पडणार नाही याची विरोधकांना धास्ती वाटत असल्यामुळे नागरिकांमध्ये आपल्या हस्तकांमार्फत संभ्रम निर्माण करायचा हा कोल्हे परिवाराचा धंदा जुनाच आहे.
त्यामुळे उगाचच संभ्रम निर्माण करू नये.ज्यांना मागील पाच वर्षात जे जमले नाही ते ना.काळे यांनी निवडून येताच दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करून प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करून दाखविले हे कोपरगावच्या जनतेने पाहिले आहे. ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२३ कोटीच्या खर्चाला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार असून कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर, ब्रिजलाल नगर,बेट मोहनीराज नगर,संजयनगर याठिकाणी पाण्याच्या टाक्या देखील बांधण्यात येणार आहे.त्यामुळे कोल्हेंच्या बगलबच्यांनी उगाच वावड्या उठवून जनतेत संभ्रम पसरवू नये असे आवाहनही शेवटी बोरावके यांनी केले आहे.