कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुका शासकीय समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका शासकीय समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त
यात युवा कार्यकर्ते आकाश संजय नागरे यांची रोजगार हमी योजना समितीवर तर सविता महेंद्र विधाते यांची तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीवर,तुषार संजय पोटे यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर तर सदस्य सुनील आसाराम साळुंखे यांची कोपरगाव शहर अध्यक्ष कोपरगाव तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिति सदस्य पदी निवड झाली आहे.स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी म्हणून रविंद्र रामनाथ साबळे यांनी निवड झाली आहे.
रोजगार हमी योजना समिती प्रवर्ग मागासवर्गीय अशासकीय सदस्य म्हणून सुरेश केशवराव शिंदे यांनी निवड झाली आहे.अशासकीय सदस्य मंगल संजय आव्हाड यांची तालुकास्तरीय सार्वजनिक व्यवस्था व दक्षता समितीवर,यादव शंकर त्रिभुवन तालुकास्तरीय समन्वयक व पुनर्विलोकन समितीवर निवड झाली आहे. राजू पठाण नगरपालिका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती प्रवर्ग समितीवर,विष्णू एकनाथ पाडेकर त्यांची आत्मा समिती गठीत प्रवर्ग फुलोत्पादन समितीवर तर शेतकरी प्रशांत सुदामराव अहिरे अवैध दारू प्रतिबंध घालण्यासाठी समितीवर निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीं अभिनंदन केले आहे.