नगर जिल्हा
सावळीविहिर येथे संत नरहरी जयंती उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
सावळीविहिर-(प्रतिनिधी)
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे संत श्री नरहरी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
सावळीविहीर बुद्रुक येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर मंदिर सभामंडपात श्री संत नरहरी महाराज यांची प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून भाविकांनी श्री संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे, शांताराम जपे, संतोष आगलावे, राजेंद्र गडकरी ,विठ्ठल दहीवाळ, निलेश आरणे, कैलास पळसे, रवींद्र पळसे ,गणेश पळसे, बाळासाहेब दहिवाळ, लाला दहिवाळ, अमोल दहिवाळ चंद्रकांत जपे, गणेश पळसे भारत थोरात ,ओमकार दहिवाळ, राजू भुसे, शहाणे , काकू पळसे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते,
यावेळी संतोष पळसे यांनी श्री संत नरहरी महाराजांच्या कार्याचा व त्यांच्या धार्मिक प्रचार, प्रसाराचा उल्लेख केला, संत नरहरी महाराज एक महान संत होऊन गेले असून धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य अजरामर झाले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले,