कोपरगाव तालुका
कोपरगाव साठवण तलावाच्या कामाला आला वेग -नागरिकांत समाधान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
कोपरगाव शहराची पाण्याची टंचाई दूर करण्यात भविष्यात अहंम भूमिका निभावू शकणाऱ्या व नगरपरिषदेने नुकताच प्रारंभ केलेल्या पाच नंबर साठवण तलावाचे खोदाईचे काम सलग दहाव्या दिवशी प्रगतीपथावर असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी नुकतीच या साठवण तलावाच्या खोदाईची पाहणी केली असून समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यावर या प्रश्नावर भर दिला आहे.व राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे.खा.पवारांनी समृद्धी महामार्गाच्या गायत्री कंपनीच्या ठेकेदाराचे कान उपटून यात राजकारण न आणण्याची तंबी दिल्यावर तो सुतासारखा सरळ होऊन त्याने लागलीच या कामास हिरवा कंदील दाखवून आपली मशिनरी उपलब्ध करून दिली होती.

कोपरगाव शहरातील नागरिकांना सदोष पाणीवाटप पद्धत व पाणीचोरीमुळे गेल्या काही वर्षापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यावर या प्रश्नावर भर दिला आहे.व राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे.खा.पवारांनी समृद्धी महामार्गाच्या गायत्री कंपनीच्या ठेकेदाराचे कान उपटून यात राजकारण न आणण्याची तंबी दिल्यावर तो सुतासारखा सरळ होऊन त्याने लागलीच या कामास हिरवा कंदील दाखवून आपली मशिनरी उपलब्ध करून दिली होती.या पूर्वी त्याने अनेक वेळा कधी हा तर कधी ना-ना करत कोपरगावच्या सत्ताधाऱ्यांचे गत तीन वर्षे पाणी चाखले होते.अखेर तो सत्ताधाऱ्यांचा सांगितल्या कामाचा ठेकेदार असल्याने त्याचा नाविलाज झाला होता.हे अनेकवेळा व अनेक बैठकीत सिद्ध झाले होते.
राज्यात ऑक्टोबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तातंर झाले व महाघाडीचे सरकार सिंहासनावर आल्यावर लागलीच कोपरगाव तालुक्याचे राजकीय पारडे अचानक फिरले होते.व निळवंडे बंदिस्त जलवाहिणीच्या थापा बंद झाल्या होत्या.आता हा तलाव होणार असल्याने दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे व शेतीचे पाणी वाचण्यास मदत होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.आशुतोष काळे यांनी प्रारंभापासून या वास्तववादी पाच क्रमांकाच्या तलावाचे काम हाती घेतल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र राज्यात ऑक्टोबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तातंर झाले व महाघाडीचे सरकार सिंहासनावर आल्यावर लागलीच कोपरगाव तालुक्याचे राजकीय पारडे अचानक फिरले होते.व निळवंडे बंदिस्त जलवाहिणीच्या थापा बंद झाल्या होत्या.आता हा तलाव होणार असल्याने दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे व शेतीचे पाणी वाचण्यास मदत होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.आशुतोष काळे यांनी प्रारंभापासून या वास्तववादी पाच क्रमांकाच्या तलावाचे काम हाती घेतल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे उदघाटन
सोमवार दि.६ जानेवारी रोजी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते व कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले होते .
समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने या साठवण तलावाचे खोदाईचे काम आता मोठ्या वेगाने सुरु केले आहे.मागील दहा दिवसापासून नियमितपणे खोदाईचे काम अविरतपणे सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार साठवण तलावाच्या खोदाई कामाचा आढावा घेत आहे. पाच नंबर साठवण तलावाचे मोठ्या प्रमाणात खोदाईचे काम झाले असून मोठ्या प्रमाणात दगड, मुरूम, माती समृद्धी महामार्गासाठी वापरली जात आहे.साठवण तलावाचे खोदाईचे काम सुरु झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरीकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. या साठवण तलावाच्या सुरु असलेल्या खोदाई कामाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, हिरामण गंगूले,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख व पदाधिकारी या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.



