कोपरगाव तालुका
गौतम पब्लिक स्कूल येथे चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूलमध्ये स्व.सुशीलामाई काळे यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन ) संस्थेचे विश्वस्त व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
राज्यस्तरीय कै.रविंद्र पाटील हॉकी स्पर्धेचे उदघाटन संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या शुभहस्ते आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.
सदर स्पर्धेचे अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १४ शाळेतील एकूण ६५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सिक्रेट इंग्लिश स्कूल, अहमदनगर, ध्रुव अकादमी संगमनेर, आत्मा मलिक स्कूल, कोकमठाण व परिसरातील शाळा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे व सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा संस्थेचा नेहमी प्रयत्न असतो. त्यासाठी गौतम पब्लिक स्कुलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धांचे वर्षभर यशस्वी आयोजन केले जाते.
याप्रसंगी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा संस्थेचा नेहमी प्रयत्न असतो. त्यासाठी गौतम पब्लिक स्कुलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धांचे वर्षभर यशस्वी आयोजन केले जाते.
सुशीलामाई काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गौतम पब्लिक स्कूलमध्ये (दि.१६) जानेवारी रोजी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, (दि.१७) जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा, (दि.१८) जानेवारी रोजी राज्यस्तरीय कै.रविंद्र पाटील हॉकी स्पर्धेचे उदघाटन संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या शुभहस्ते आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.या कार्यक्रमासाठी गौतमच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.