आरोग्य
जिल्ह्यातील ग्राहकांचा भुर्दंड व्यापाऱ्यांवर नको-नगराध्यक्ष
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दक्षिण आफ्रिकेत आढळल्या ओमीक्रोन विषाणूने भीतीचे वातावरण पसरले असून केंद्र आणि राज्य सरकारने विविध नवीन नियमावली जाहीर केली आहे.त्यामुळे व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.अशातच तोंडाला मुखपट्या लावल्या नाही तर त्यास दुकांडार्णना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा नियम जाहीर केला असून हा अन्यायकारक असल्याची टीका कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत देशात ८ हजार ३०९ नव्या रुग्णांची भर पडली आहे.तर ९ हजार ९०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या १२२ कोटी ४१ लाख डोस देण्यात आले आहेत.देशाचा रोगमुक्ती दर सध्या ९८.३४% आहे.याखेरीज नवीन विषाणूंचा वेग पहिल्या डेल्टा पेक्षा सहापट अधिक आसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.त्यामुळे राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.त्यात हा सुलतानी दंड वसुलीची तरतूद आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे.ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ओळखून देशांमध्ये सतर्कतेचं वातावरण आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करत उपाययोजनाची चचपणी करण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत देशात ८ हजार ३०९ नव्या रुग्णांची भर पडली आहे.तर ९ हजार ९०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या १२२ कोटी ४१ लाख डोस देण्यात आले आहेत.देशाचा रोगमुक्ती दर सध्या ९८.३४% आहे.याखेरीज नवीन विषाणूंचा वेग पहिल्या डेल्टा पेक्षा सहापट अधिक आसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.त्यामुळे राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.त्यात कठोर नियम-शिक्षा-दंड आणायलाच पाहिजे असे म्हटले आहे.पण असे नियम करत असताना कुणावरही नाहक अन्याय होऊ नये याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.कुठल्याही व्यावसायिक आस्थापनात-दुकानात विनामास्क एक जरी ग्राहक आढळला तर आस्थापना चालकाला,दुकान मालकांना १० हजार रू.दंड आकारण्यात येईल असा अतिशय अन्यायकारक नियम-आदेश शासनाने काढला आहे.
ग्राहकांच्या चुकीची शिक्षा दुकान मालकाला,व्यापाऱ्यांना देणे पूर्णपणे चुकीचे आहे.एकाचा अपराध दुसऱ्याच्या माथी मारण्याचा हा प्रकार अन्यायकारक आहे.असा प्रकार होऊ द्यायचा नसेल तर हा नवीन नियम-आदेश शासनाने त्वरित मागे घ्यावा.आधीच दोन वर्षात लहान मोठ्या सर्वच व्यवसायिकांवर अरिष्ट कोसळलेले आहे.त्यात असा अन्याकारक देश देऊन शासनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडू नये.जनतेनेही कोरोनाचा पराभव करण्यासाठी मास्कचा न चुकता वापर करून सामाजिक अंतर हे नियम पाळलेच पाहिजेत.नागरिकांनी हे नियम पाळले नाहीत तर स्वतःबरोबरच संपुर्ण समाजालाच धोका निर्माण होईल याचा गांभीर्याने विचार करून आपली वर्तणूक ठेवली पाहिजे असे आवाहनही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केलेलं आहे.