पशुसंवर्धन विकास
दूध उत्पादक शेतकऱ्यांना बायफतर्फे मोफत खनिज मिश्रण वाटप
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असललेल्या गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय कृषी केंद्रीय गोवंश अनुसंधान संस्था,मेरठ ( उत्तरप्रदेश ) पुरस्कृत व बायफ ( बी.आय.एस.एल.डी. ) नाशिक या संस्थेच्यावतीने संघाला दूध पुरवठा करणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्यांना प्रत्येकी पाच किलो खनिज मिश्रण मोफत वाटप करण्यात आले आहे.
“गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्यावतीने अत्याधुनिक डिजीटल कृत्रिम रेतन गन मशिन्स कार्यक्षेत्रातील कुंभारी व वारी येथील पशुधन विकास केंद्रांना वाटप करण्यात आल्या आहेत. या दोन केंद्रातील उपयुक्तता विचारात घेवून नंतर कार्यक्षेत्रातील सर्वच पशुधन विकास केंद्रांना या गन मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे”-राजेश परजणे, अध्यक्ष गोदावरी परजणे तालुका दूध उत्पादक संघ.
गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केल्या गेलेल्या या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा संघाच्यावतीने ज्येष्ठ संचालक राजेंद्रबापू जाधव,कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी तर बायफ संस्थेच्यावतीने कोपरगांव कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जिगळेकर यांनी सत्कार केला आहे.त्या वेळी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
संघाला दूध पुरवठा करणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रत्येकी पाच किलो प्रमाणे खनिज मिश्रण (मिनरल मिक्श्चर ) वाटप करण्यात आले.सुमारे दोनशेहून अधिक लाभार्थ्यांना खनिज मिश्रणाचा लाभ मिळवून देण्यात आला.दूध उत्पादन वाढीसाठी या खनिज मिश्रणाचा उपयोग होत असल्याने त्याला दुध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
सदर कार्यक्रमास विकास आढाव,जयदीप रोहमारे,अजित कोरके,सुधाकर बाबर,भालचंद्र राऊत,विशाल खैरे,सचिन वाघमारे,बाळासाहेब कोल्हे यांच्यासह बायफचे कृत्रिमरेतन तंत्रज्ञ, संघाचे संचालक,दूध उत्पादक शेतकरी,संघाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्यावतीने अत्याधुनिक डिजीटल कृत्रिम रेतन गन मशिन्स कार्यक्षेत्रातील कुंभारी व वारी येथील पशुधन विकास केंद्रांना वाटप करण्यात आल्या आहेत. या दोन केंद्रातील उपयुक्तता विचारात घेवून नंतर कार्यक्षेत्रातील सर्वच पशुधन विकास केंद्रांना या गन मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या यंत्रणेमुळे कृत्रिमरेतन प्रक्रिया अतिशय सुलभ व खात्रीशीर होणार असल्याने कृत्रिमरेतन तंत्रज्ञांचीही कामे यामुळे सोपी होणार आहेत.ही अत्याधुनिक यंत्रणा गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात आलेली आहे.दुग्ध व्यवसायामध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत असून गोदावरी दूध संघाने अशा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन संघाच्या कामकाजात अमुलाग्र बदल बदल घडवून आणला असल्याचेही श्री परजणे यांनी शेवटी सांगितले आहे.