जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसिंचन

निळवंडेच्या कालव्यांच्या कामासाठी मोठी तरतूद,निधी वर्ग

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त असणाऱ्या सिन्नरसह सात तालुक्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकताच १९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तो निधी नुकताच खात्यावर जमा करण्यात आला असल्याची माहिती माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संगमनेर तालुक्यातील भूसंपदानात ३४१ कोटी रुपये खर्च झाल्याने फार थोडा निधी कामासाठी शिल्लक होता.त्यामुळे निधीची पुन्हा एकवार चणचण निर्माण झाली होती.व ठेकेदारांचे सुमारे ६० कोटी रुपयांचे देणे थकले होते.व प्रकल्पाच्या ठेकेदारांनीं केलेल्या कालव्यांच्या कामाची प्रलंबित देणी व उर्वरित मुख्य कालव्यांसाठी ६०० कोटी तर वितरिकांसाठी ८०० कोटी असे एकूण ०१ हजार ४०० कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता होती.त्यासाठी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले,सोन्याबापू उऱ्हे सर यांनी याबाबत माजी खा.प्रसाद तनपुरे यांची दि.१८ ऑक्टोबर रोजी राहुरी येथे भेटून राज्याचे जलसंपदा मंत्री यांना निवेदन दिले होते.त्यावर हि तरतूद झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अ,नगर जिल्ह्यातील अप्पर प्रवरा-२ (निळवंडे प्रकल्प) या प्रकल्पाला प्रथम मंजुरी दि.१४ जुलै १९७० रोजी मिळाली.आजता गायत या प्रकल्पाला बावन्न वर्ष उलटत आली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे धरणाची भिंत आधी व कालवे बावन्न वर्षात होऊ शकले नाही.त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील १८२ दुष्काळी गावातील जवळपास ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे.शिवाय या भागात शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी विवाहासाठी मुली देत नसल्याने मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.या गावातील शेतकऱ्यांना शेती असूनही त्यांना खडी फोडण्यासाठी दुर्दैवाने जावे लागत आहे.या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांचे काम जवळपास ३० टक्के तर वितरिकांचे पूर्ण काम बाकी आहे.निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अड्.अजित काळे यांचे मार्फत जनहित याचिका (१३३/२०१६) दाखल करून न्याय मागीतला होता.प्रवरा काठच्या काही राजकीय शक्तींनी आपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवलेले काम विनाअडथळा सुरु करण्याचा दि.०३ मे २०१९ रोजी आदेश मिळवला होता.त्या नंतर पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आले होते.तो पासून काम विना अडथळा सुरु आहे.काही सहा महिन्यांपूर्वी सरकारने कालवा कृती समितीने माजी खा.प्रसाद तनपुरे,व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मार्फत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे मागणी केली होती.त्या नुसार ४९१ कोटींची आर्थिक तरतूद केली होती.
मात्र हा निधी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी व निळवंडे येथील भूसंपदानात ३४१ कोटी रुपये खर्च झाल्याने फार थोडा निधी कामासाठी शिल्लक होता.त्यामुळे निधीची पुन्हा एकवार चणचण निर्माण झाली होती.व ठेकेदारांचे सुमारे ६० कोटी रुपयांचे देणे थकले होते.व प्रकल्पाच्या ठेकेदारांनीं केलेल्या कालव्यांच्या कामाची प्रलंबित देणी व उर्वरित मुख्य कालव्यांसाठी ६०० कोटी तर वितरिकांसाठी ८०० कोटी असे एकूण ०१ हजार ४०० कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता होती.त्यासाठी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले,सोन्याबापू उऱ्हे सर यांनी याबाबत माजी खा.प्रसाद तनपुरे यांची दि.१८ ऑक्टोबर रोजी राहुरी येथे भेटून राज्याचे जलसंपदा मंत्री यांना निवेदन दिले होते.व निधीची तातडीने ०१ हजार ४०० कोटींची मागणी केली होती.त्यानुसार हि १९० कोटींची तरतूद झाली आहे.त्याला जलसंपदाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी दुजोरा दिला आहे.

त्यामुळे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छिन्द्र दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,संदेश देशमुख,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,सचिव कैलास गव्हाणे,दत्तात्रय चौधरी,विठ्लराव देशमुख,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,रमेश दिघे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,सुधाकर शिंदे,विक्रम थोरात,भरत शेवाळे,कौसर सय्यद,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,संतोष गाढवे,अशोक गांडूळे,विठ्लराव पोकळे,संतोष तारगे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,सोपान थोरात,दत्तात्रय थोरात,रावसाहेब थोरात,बाळासाहेब रहाणे, रामनाथ पाडेकर,दगडू रहाणे, भाऊसाहेब चव्हाण,अलिमभाई सय्यद,आदींनी समाधान व्यक्त केले आहे.व जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close