कोपरगाव तालुका
‘त्या’निर्णयामुळे कोपरगाव न.प.नगराध्यक्षांचा केला सत्कार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दीपावली सणा निमित्त कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सण अग्रिम,कोविड काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा,५ टक्के महागाई भत्ता फरक,माहे ऑक्टोबर महिन्याचा पगार आदी देण्याचा निर्णय नुकताच कोपरगाव नगरपरिषदने घेतल्याने व तो निधी कर्मचारी अधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याने कर्मचारी खुश झाले असून त्यांनी आज नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी आदींचा आज सत्कार केला आहे.
“या दिवाळी उत्सवाला कर्मचाऱ्यांना आनंद मिळावा यासाठी खबरदारी घेतली आहे.व त्यानुसार दिवाळी सण अग्रिम,कोविड काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा,५ टक्के महागाई भत्ता (जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९) फरक,माहे ऑक्टोबर महिन्याचा पगार आदी देण्याचा निर्णय घेतला आहे.कर्मचारी अधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
मागील दोन वर्ष कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगातच भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे मागील दोन वर्ष कोणतेही सण,उत्सव आनंदात आणि एकत्र येवून साजरे करता आले नव्हते मात्र यावर्षी कोरोनावर मात केली असून यात आरोग्य विभागाचा मोठा वाटा असून यावर्षी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रिम,महागाई भत्ता,व ऑक्टोबर महिन्याचा पगार आदी देण्याचा निर्णय कोपरगाव नगरपरिषदेने नुकताच घेतला असून त्याची कार्यवाही करण्यात आली आहे.याबाबत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.या पार्श्वभुमीवर हा सत्कार करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र गाडे यांनी केले तर रवींद्र वाल्हेकर यांनी “नगरपरिषदेचे अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहमी कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली आहे.व त्यांच्या गरजा ओळखून न मागता कर्मचारी हिताचे निर्णय घेतले आहे.अशी पदाधिकारी मिळणे दुर्मिळ असून सर्व कर्मचारी आपले काम नेहमी स्मरणात ठेवतील” असा आशावाद व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी अध्यक्ष विजय वहाडणे,उपाध्यक्ष आरिफ कुरेशी,मुख्याधिकारी शांताराम गोसावी आदींचा शाल,हार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे लेखाधिकारी तुषार नालकर,कोपरगाव नगरपरिषद संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे,कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडे,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,संजय तिरसे,प्रशांत चव्हाण,सफाई कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष रणधीर तांबे,अध्यक्ष पवन हाडा,कार्याध्यक्ष विजय डाके,उपाध्यक्ष योगेश कोपरे, रवींद्र दिनकर,सचिव अरुण फाजगे,योगेश साळवे,सल्लागार मनोज लोट, रवींद्र वाल्हेकर,रमेश घोरपडे,राजेंद्र तुजारे,आदींसह महिला कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र गाडे यांनी केले त्यावेळी रवींद्र वाल्हेकर यांनी “नगरपरिषदेचे अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहमी कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली आहे.व त्यांच्या गरजा ओळखून न मागता कर्मचारी हिताचे निर्णय घेतले आहे.अशी पदाधिकारी मिळणे दुर्मिळ असून सर्व कर्मचारी आपले काम नेहमी स्मरणात ठेवतील” असा आशावाद व्यक्त केला आहे.उपस्थितांचे आभार आरोग्य निरीक्षक सुनील आरणे यांनी मानले आहे.