जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात एकाचा खून,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राज्याच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कामावर काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रस्त्यावरून डम्परला जाण्यास हरकत घेतली व दिल्ली येथील डंपर चालक जगबिरसिंग रामकिसन सिंग (वय-५६ ) यास आरोपी सचिन सुदामराव खटकाळे (वय-३४) रा.खटकाळेवस्ती लौकी,नितीन सोमनाथ पवार (वय -२३) रा.मयुरनगर भोजडे यांनी खाली खेचून लाथाबुक्कयाने जबर मारहाण जिवे ठार मारले आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.मात्र कोपरगाव पासून घोटी पर्यंत या कामाला अद्याप न्याय दिला गेलेला नाही.त्यामुळे सरकारचे व या महामार्गालगतच्या गावांच्या संलग्न रस्त्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.अनेक अपघात होऊन जीवित व वित्तीय हानी होत आहे.त्यामुळे नजीकच्या गावात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.त्यातून ग्रामस्थ आंदोलने,मोर्चे काढीत असून या रस्त्याच्या नुकसानींबद्दल मोठा संताप व्यक्त होत आहे.त्यातून हि घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”भाजप राजवटीत महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम सुरु केले आहे.राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी या महामार्गाचे नाव बदलण्यात आले आहे.या मार्गाची लांबी ७१० कि.मी.आहे.सरकारने नागपूर-मुंबई शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.त्याचे काम नागपूरच्या बाजूने आटोपले असले तरी नगर जिल्ह्यात मात्र त्याला मंद गतीने ग्रासले आहे.नगर जिल्ह्यात गायत्री या कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे.मात्र त्यांनी या कामाला योग्य न्याय दिलेला नाही.नागपूर ते शिर्डी हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.मात्र कोपरगाव पासून घोटी पर्यंत या कामाला अद्याप न्याय दिला गेलेला नाही.त्यामुळे सरकारचे व या महामार्गालगतच्या गावांच्या संलग्न रस्त्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.अनेक अपघात होऊन जीवित व वित्तीय हानी होत आहे.त्यामुळे नजीकच्या गावात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.त्यातून ग्रामस्थ आंदोलने,मोर्चे काढीत असून या रस्त्याच्या नुकसानींबद्दल मोठा संताप व्यक्त होत आहे.त्यामुळे या अवजड वाहतुकीस ग्रामस्थ विरोध करत आहे.संवत्सर शिवारात नुकतीच पंधरा दिवसापूर्वी घडली होती.मात्र ते केवळ आंदोलनावर निभावले होते.मात्र भोजडे येथे दि.२८ ऑक्टोबर रोजी या विपरीत घटना घडली आहे.कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास सुमारास भोजडे लौकी जाणारे रस्त्यावर भोजडे गावचे शिवारात वादे यांचे पोल्ट्रीजवळ घडली आहे.मात्र हे प्रकरण आंदोलनावर नाही तर चालकाच्या जीवावर उठले आहे.याचे समर्थन कोणीही करणार नाही.मात्र याची दखल शासनास घ्यावी लागणार आहे.यात आरोपी सचिन खटकाळे,नितीन पवार यांनी डंपर बुमप्रेशर गाडी (क्रं.पी.बी.१३,बी.डी.५५६९) हिला अडवून तीचे वरील चालक जगबिरसिंग रामकिसन सिंगरा.बी-२/२०८ बी.-२ ब्लॉक,रोहिणी एक्सटेंशन,सेक्शन २० नवी दिल्ली-११००८१ यास,”या रस्त्याला खड्डे पडले असुन इकडुन गाडी घेऊन यायचं नाही”,”तु का आला ? व “समृधी महामार्गाच्या गाडया घेऊन जायच्या नाही” असे सांगुन पण तुझी बुम प्रेशरची गाडी का आणली ? असे म्हणुन मयतास शिवीगाळ करुन त्याचे पोटात लाथ मारुन जमिनीवर पाडून त्याचे छाती व पोटात लाथाबुक्कयाने जबर मारहाण करुन त्याला जिवे ठार मारले आहे.दरम्यान या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असून कुंदन सुरेशकुमार महंतो (वय-२५) वर्षे,धंदा-क्लिनर,रा.पडौली,थाना-पुचरुखी,जि.शिवांग,राज्य-बिहार हल्ली रा.तीनचारी,कोकमठाण यांनी ती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.घटनास्थळी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे.या गुंह्यातील दोन्ही आरोपी अटक केली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२व कलम-३७१/२०२१ भा.द.वि.क.३०२,३४१,३२३५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close