कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात ‘टपाल दिन’ उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
संवत्सर येथे पोस्टल डे निमित्त विविध पोस्ट योजनांचे आयोजन,देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने ७५ वर्ष पूर्ण झाल्याने तसेच पोस्टल सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे हे होते.
०९ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक टपालदिन म्हणुन साजरा केला जातो.यू.पी.यू. द्वारा या दिवसाची घोषणा टोकियो येथे करण्यात आली.यू.पी.यू.म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना स्विसची राजधानी बर्न येथे १८७४ साली झाली आहे.कोपरगाव तालुक्यात संवत्सर येथे हा टपाल दिन उत्साहात संपन्न झाला आहे.
०९ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक टपालदिन म्हणुन साजरा केला जातो.यू.पी.यू. द्वारा या दिवसाची घोषणा टोकियो येथे करण्यात आली.यू.पी.यू.म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना स्विसची राजधानी बर्न येथे १८७४ साली झाली आहे.संपूर्ण जगात हा दिवस साजरा करण्याचा हेतू हाच आहे की,या दिवसानिमित्ताने जनजागृती व्हावी.पोस्टाच्या कामाची माहीती व्हावी.समाजामधे पोस्टाचे महत्व वाढीस लागावे.या दिवशी जगातील अनेक देशात सुटी देण्यात येते. या दिवसाचे महत्व जाणून कांही देशात नवनवीन योजना जाहीर केल्या जातात आणि त्या राबवल्याही जातात.उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना पुरस्काराने सन्मानित केले जाते.सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कांही ठिकाणी नवीन टपाल तिकिटांचे विमोचन केले जाते.सार्वजनिक ठिकाणी जाहिराती केल्या जातात तसेच स्मरणिकाही काढल्या जातात.कोपरगाव येथील संवत्सर येथे हा दिन मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
या प्रसंगी कोपरंगाव डाक विभागाचे डाक निरीक्षक विनायक शिंदे,डाक जीवन विमा योजनेचे विस्तार अधिकारी विजय कोल्हे,मेल ओव्हर्सियर अर्जुन मोरे,संजय ढेपले,इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मॅनेजर प्रतीक पाटील,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,सोमनाथ निरगुडे,सुभाष दरांगे,चंद्रकांत लोखंडे,निवृत्ती लोखंडे,लक्ष्मण परजणे, सुदाम कांबळे,बाबुराव मेंद,अर्जुन तांबे,दिलीप ढेपले गुरुजी,राजू भोकरे,बाळू भोसले,अविनाश गायकवाड,जॅकीर पठाण,मोहन सोनवणे,अंकल साळुंके,चारूदत्त गायकवाड,दत्ता गायकवाड, राहुल आढाव,जीवन पावडे,ज्ञानदेव गायकवाड,किशोर दिघे,लक्ष्मण भोकरे,बाळू आहेर,हौशीराम भिंगारे,राजू भागवत,ईजाज शेख,भैया शेख आदी मान्यवर कोरोनाचे नियमांचे पालन करून उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना परजणे म्हणाले की,”पोस्ट ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास असलेली एकमेव सरकारी हक्काची जागा असून पोस्टमन हा गावातील सर्वांच्या परिचयाचा असल्याने एक हक्काचा आपला माणूस म्हणून आपण बघतो,पोस्टाने सर्व व्यवहार ऑनलाईन केल्याने गाव पातळीवर आर्थिक कामे होत असल्याने शहरात येण्याची गरज पडत नाही .
यावेळी कोरोंना योध्दा म्हणून ग्रामविकास अधिकारी कृष्णादास अहिरे यांचा विजय कोल्हे यांनी सन्मान केला.विनायक शिंदे यांनी सुकन्या समृद्धी आरडी सेव्हिंग बँक टी.डी.एम.आय.एस.आधार पेमेंट,आधार अपडेटिंग,ग्रामीण विम्याचे महत्व पटवून देत जनजागृती केली.
या वेळी प्रथम नवीन टपाल पेटीचे पूजन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मणराव साबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप ढेपले यांनी मानले आहे.