कोपरगाव तालुका
श्रीरामपूरच्या मोटार वाहन निरिक्षकांचा दौरा जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव, संगमनेर,राहाता,अकोले,राहूरी,प्रवरानगर आणि नेवासा तालुक्यातील नागरिकांच्या सोईसाठी श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी कोपरगाव येथे.पहिला,दुसरा तिसरा व चौथ्या सोमवारी संगमनेर येथे.पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी अकोले येथे.दुसरा व चौथ्या मंगळवारी राहूरी येथे.पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी राहाता येथे.दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी प्रवरानगर येथे आणि दुसऱ्या व चौथ्या बुधवारी नेवासा येथे शिबीर दौरा आयोजित करण्यात आला आहे. संबधित ठिकाणच्या नागरिकांनी आपली कामे वर दर्शविलेल्या दिवशी शिबीराच्या ठिकाणी करुन घ्यावीत. शिबीर आयोजित केलेल्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी शिबीर दौरा रद्द असेल. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.