आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णवाढिस उतार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णवाढीसाठी संगमनेर पाठोपाठ स्पर्धा सुरू झाली असून काल अलीकडील काळातील सर्वाधिक ४१ रुग्ण आढळून आले होते. आज आलेल्या अहवालात पोहेगाव गटातील बहादरपूर ०२,रांजणगाव देशमुख,मनेगाव,डाऊच बुद्रुक,सोनेवाडी येथे प्रत्येकी ०१ रुग्ण असे ०६ रुग्ण आढळले आहे.तर तालुक्यात दहिगाव,खिर्डी गणेश,चांदगव्हाण,साकरवाडी,मायगाव,येथे प्रत्येकी ०१ असे ०५ रुग्ण तर कोपरगाव शहरात येथे ०६ रुग्ण आढळून आले असून कारवाडी येथील एका ६५ वर्षीय महिलेचे निधन झाले आहे.दरम्यान तालुक्यात रुग्णसंख्या रोडावली आहे हि समाधानाची बाब आहे. राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५७५ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०४ रुग्ण बाधित आढळले असून ५७१ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ६५५ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०१ तर अँटीजन तपासणीत ०४ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत १२ असे एकूण अहवालात किरोकोळ वाढ येऊन केवळ १७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ०९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ५८२ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ११७ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २२१ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०२ लाख ०२ हजार २४१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०८ लाख ०८ हजार ९६४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०७.२१ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार २४४ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६८ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३४ हजार ६०१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ०२० झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख २३ हजार ०७२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ९१८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास व आठवडे बाजार प्रारंभ केला आहे.
रुग्णवाढीमुळे राहाता तालुक्यात आता नागरिकांना आपली आस्थापने केवळ सकाळी ०८ ते दुपारी ०४ पर्यंत उघडण्यास परवानगी दिली असून वेळ घटवली आहे.व जिल्ह्यात जवळपास एकसष्ठ गावे प्रतिबंधित केले आहे.त्यात कोपरगाव तालुक्याचा समावेश असून या तालुक्याचा आलेख अलीकडील काळात चिंताजनक वाढला आहे.त्यामुळे प्रशासनने आता कोरोना लसीचा वेग विलक्षण वाढवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही रुग्णसंख्या रोडावण्यास मदत होत आहे.त्यामुळे नागरिकांत पुन्हा समाधानाचे वातावरण पसरण्यास सुरुवात झाली आहे.