शैक्षणिक
कोकमठाण शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
न्यूजसेवा
बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शाळेची घंटा वाजली त्यामुळे तालुक्यातील कोकमठाण शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व समिती सदस्य,शिक्षणप्रेमी नागरिक,ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत शासन आदेशानुसार इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि त्यांचा स्वागत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार करण्याचा निर्णय मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता.त्या माहितीनुसार येत्या आज ०४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत.शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता.व त्या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती.त्याची अमंलबजावणी आज पासून सुरु करण्यात आली आहे.त्याला कोकमठाण शाळा अपवाद नाही.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार करण्याचा निर्णय मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता.त्या माहितीनुसार येत्या आज ०४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत.शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता.व त्या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती.कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.त्याची अंमलबजावणी आज पासून सुरु झाली आहे.त्याला कोपरगाव तालुक्यातील शाळाही अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील शाळाही नुकतीच सुरु करण्यात आली आहे.
कोकमठाण येथील शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे श्रीमती ढुमणेताई यांनी कार्यक्रमाची सुरुवात स्वरचीत विद्यार्थी स्वागतगीत कविता सादर करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.कोरोना महामारीनंतर तब्बल दिड वर्षानंतर शाळा सुरू झाली आहे.विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह वाढलेला दिसत होता.मुख्याध्यापक जाधव मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी फुगे,मिकी माऊस,टेडी बिअर आणि रांगोळी काढून स्वागताची जय्यत तयारी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध वेशभूषेतील व शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. व मुलांच्या ऑक्सिजनची पातळी व तापमानाच्या नोंदी घेण्यात आल्या. सर्व ग्रामस्थांनी यावेत शाळेचे कौतुक केले.