कोपरगाव तालुका
कोपरगावातील ‘त्या’ अधिकाऱ्याची बदली,झाली की केली ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील एका महत्वपूर्ण महसुली अधिकाऱ्याची तातडीने बदली झाली असून हि बदली मुदतपूर्व झाली आहे.की प्रशासनाने ती केली की लोकप्रतिनिधींनी यात हस्तक्षेप केला आहे.या बाबत नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधीने याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते फक्त मिश्कीलपणे हसले व दर अडीच वर्षांनी अधिकारी हे बदलीसाठी पात्र होतात.मात्र हि बदली झाली हि केली याबाबत सविस्तर मौन पाळले आहे.मात्र बदली झालेल्या अधिकाऱ्याचे थोडक्यात कारनामे उघड केल्यावर तेही अवाक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.मात्र लोकप्रतिनिधींशी संपर्क स्थापित होऊ शकला नाही.
कोपरगाव तालुक्यातील महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची साधारण एप्रिल २०१९ मध्ये कोपरगावात नंदुरबार येथून बदली झाली होती.त्याची बदली झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात चीन मध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला होता.व जानेवारीच्या सुरुवातीला त्याचे रुग्ण निघण्यास प्रारंभ झाला होता.सुरुवातीच्या कोरोनाच्या प्रतिकूल कालखंडात त्यांनी या साथीला आवर घालण्यास चांगलीच साथ दिली होती.त्यात अर्थातच पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची भूमिका निर्णायक ठरली होती.त्यामुळे कोरोना नियंत्रणात राहिला यात काही शंका नाही.मात्र त्यानंतर त्यांना जिल्हाधिकारी यांनी चांगले आदर्श अधिकारी हा पुरस्कार देऊन गौरवले मात्र त्या नंतर त्यांच्या कार्यकाळास जो उतार सुरु झाला तो काही थांबण्यास नाव घेईना.त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक महसूल कर्मचारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते.हि संख्या आज पर्यंतच्या महसुली अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्वाधिक अशी अर्धा डझन आहे.त्यात महिला कनिष्ठ कर्मचारी एक उपकारागृहाशी संबंधित अधिकाऱ्याचा समावेश आहे.त्यांच्या कार्यकाळात रेकॉर्ड रुमचे कागदपत्रे खाजगी दलालांचे ताब्यात असल्याची धक्कादायक बाब उघड होऊनही त्यांची दखल त्यांना घ्यावी वाटली नाही.महसूल विभागाची कागद पत्रे करून देण्याची व त्याची नोंद ठेवण्याचे काम कनिष्ठ महसुली कर्मचाऱ्यांचे असताना राजरोस जनतेची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक केली.शेतकऱ्यांच्या कागदपत्रात जाणीवपूर्वक फेरफार करून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपिलात जायला लावायचे व त्यातून त्यांची आर्थिक लुबाडणूक करायची असा धंदा तेजीत आला होता.त्यातून अनेक शेतकरी त्रासून गेले होते.सेतू कार्यालयात विविध कागदपत्रे करताना सेतू धारकांनी जनतेची मोठी लुबाडणूक केली.शेवटी-शेवटी तर महसूल कार्यालयातील दाखल्यांचे ऑनलाइन काम थेट बाहेरील खाजगी अवैध सेतूचालक करताना आढळून येऊनही त्याची कृती केवळ बघ्याची व संशयास्पद ठरली होती.त्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणावर विद्यमान लोकप्रतिनिधींकडे तक्रारी गेल्या होत्या.त्यातून ते ‘या’ अधिकाऱ्याची बदली करण्यास प्रयत्नशील होते अशी विश्वसनिय माहिती आहे.
कोपरगाव शहरातील मनसेने पुरवठा विभागातील भ्रष्टाचार पुराव्यासह उघड केला होता.व पुरावाही रंगेहात पकडून ‘ती’ पुराव्यासह महसूल आवारात आणूनही कारवाई झाली नव्हती.त्या दिवशी दिवसभर थांबूनही काहीही कार्यवाही झाली नव्हती हे विशेष ! एक महिन्यांपूर्वी अंत्योदय योजनेतील गहू तांदूळ यांचा काळा बाजार करणाऱ्या दोन टोळ्यांचे धारणगाव रस्त्यावर डॉ.गोंधळी हॉस्पिटल जवळ रात्री साडे अकराच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली होती.अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून कार्यवाही करावी लागली होती.
आमसभेतही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी करूनही नागरिकांना न्याय मिळण्यास अडथळा ठरत होता.आमच्या प्रतिनिधीने वाळूचोरांचा भंडा फोड केल्यावर एका कनिष्ठ कर्मचाऱ्यास हाताशी धरून थेट वकीला मार्फत बदनामीची नोटीस पाठविण्याचे धाडस करण्यात आले होते.तो कनिष्ठ कर्मचारी ‘या’नोटीसही नंतर अवघ्या आठ दिवसात लाच लुचपत विभागाने लाच घेताना पकडला होता हे विशेष ! परत या महाशयांनी काही उद्योग केले नाही मात्र आपल्या पिताश्रींना आमच्या प्रतिनिधींची कार्यालयात येऊन माफी मागायला पाठवले होते अशी खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली होती.आमच्या सुदैवाने मात्र भेट मात्र झाली नव्हती.
येथील मान्यवर अधिकाऱ्याने आपले अर्थकारण साठण्यासाठी कोपरगावात बदलीसाठी मोठे ५५ पेट्यांचे अर्थकारण घडवले होते.व आल्यावर आपले अर्थकारण यशस्वी साधण्यासाठी थेट नंदुरबारहुन कनिष्ठ कर्मचाऱ्याची राहाता मार्गे बदली करून कोपरगावात आणले होते.असाच एक कर्मचारी आता बदलीच्या ठिकाणी आधीच कार्यरत असून त्या ठिकाणी सोयीस्कर बदली करून घेतल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे हि बदली येथील लोकप्रतिनिधीने केली की आपली अधिक छि-थू नको म्हणून स्वतःहून बदली केली हा वर्तमानात कोपरगाव शहर व तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.