जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील साहित्यिक वारशाचे पुनर्निर्माण व्हावे-आशावाद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावच्या मातीचा सुगंध कवितेच्या माध्यमातून जगभर पसरावा आणि येथील साहित्यिक वारशाचे पुनर्निर्माण व्हावे,आजच्या परिस्थिती मध्ये कविता माणुसपणाची जाणीव करून देत असल्याने ती समृद्ध व्हावी,यासाठी असे साहित्यिक उपक्रम महत्वाचे आहेत असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदानंद भोसले यांनी नुकतेच केले आहे.

“कवितेत भावनेचा ओलावा असावा,विचार कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन व जनजागृती साठी मांडले जातात,आपली पाळेमुळे कोपरगावच्या मातीत रुजली,वाढली त्यामुळे कोपरगावचे आकर्षण कायम आहे,या काव्य संमेलनात सर्व कविता आशावादी आणि प्रेरणादायी आहेत”-प्रा.डॉ.सदानंद भोसले.

शब्दगंध साहित्यिक परिषद,कोपरगाव शाखेच्या वतीने आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व कोपरगाव चे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,कवी सुभाष सोनवणे,ऐश्वर्या सातभाई,प्रा.डॉ.कैलास कांबळे,सुधीर कोयटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये काव्य संमेलन संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कवितेत भावनेचा ओलावा असावा,विचार कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन व जनजागृती साठी मांडले जातात,आपली पाळेमुळे कोपरगावच्या मातीत रुजली,वाढली त्यामुळे कोपरगाव चे आकर्षण कायम आहे,या काव्य संमेलनात सर्व कविता प्रासंगिक आशावादी आणि प्रेरणादायी आहेत’

यावेळी कवी सुभाष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करून कविता सादर केली तर सुनील गोसावी यांनी शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कैलास साळगट यांनी तर स्वागत व परिचय कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे यांनी करून दिला.सदाबहार सूत्रसंचलन मधुमिता निळेकर यांनी केले तर शेवटी उपाध्यक्ष सुधीर कोयटे यांनी आभार मानले.

यावेळी झालेल्या काव्य संमेलनात वंदना चिकटे,गणेश पवार,प्रमोद घोरपडे,नारायण गडाख,साक्षी थोरात,योगेश जाधव,सुनील केकान,सुनीता आत्रे,सागर पठारे,मोहिनी लोळगे,नंदकिशोर,प्रतिभा खैरे,प्रमोद येवले,कार्तिक झेंडे यांनी आपल्या रचना सादर केल्या आहेत.या कार्यक्रमास कवयित्री शर्मिला गोसावी,हेमचंद्र भवर,ज्ञानेश्वर शिंदे,राजेंद्र उदारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close