कोपरगाव तालुका
कोपरगावात शिवसेनेच्या ..या अभियानाचा होणार प्रारंभ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री,पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना संपर्क अभियान दिनांक १२ जुलै ते २४ जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असून कोपरगावात मान्यवरांच्या उपस्थितीत राबविण्यात येणार आहे.
“शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना नुकतेच दिले आहे.शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरु करत असून कोपरगावतही त्याचा शुभारंभ होणार आहे”-कलविंदर दडियाल,अध्यक्ष,कोपरगाव शहर शिवसेना
शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना नुकतेच दिले आहे.शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरु करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले.दुरचलचित्रफितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आदेश दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर कोपरगावातही एक बैठक नुकतीच संपन्न झाली आहे.
सदर प्रसंगी आजी माजी शिवसेनेचे पदाधिकारी,जिल्हाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,विधानसभा संघटक,शहरप्रमुख, उपशहरप्रमुख,विभागप्रमुख,संघटक,शाखाप्रमुख,गावप्रमुख,गटप्रमुख,युवासेना,वाहतूक सेना,ग्राहक संरक्षण कक्ष,शेतकरी सेना,वैद्यकीय कक्ष,युवती सेना,व्यापारी सेना,रिक्षा सेना,एसटी कामगार सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी,नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ‘माझे गाव कोरोना मुक्त गाव’अभियान राबविण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यात शिवसेना संपर्क अभियाना चा शुभारंभ राज्याचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभ हस्ते तसेच खा.व नुतन साईबाबा संस्थान विश्वस्त सदाशिव लोखंडे व नगर उत्तर जिल्हाप्रमुख व नूतन साईबाबा संस्थान विश्वस्त रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत राबविण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव शहर प्रमुख कलविंदर दडियाल यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रम हा कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक १३ जुलै २०२१ वार मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे.तरी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाप्रमुख राजेन्द्र झावरे,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे व शहर प्रमुख कलविंदर दडियाल यांनी केले आहे.