शैक्षणिक
काळे एज्युकेशन सोसायटीच्या १८विद्यार्थ्यांची शिबीर मुलाखतीत निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या घेण्यात आलेल्या शिबीर मुलाखतीत १८ विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सुशिलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर व एन. आय.आय.टी.यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह अंतर्गत कॅम्पस इंटरव्ह्यूचे आय.सी.आय.सी.आय. बँकेतील सिनिअर ऑफिसर या पदासाठी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातील मुलाखतीमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यापैकी निवडीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी एकूण १८ विद्यार्थ्यांची निवड केली.या सर्व विद्यार्थ्यांना ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात येणार होती. त्यापैकी काही उमेदवारांनी आपले ट्रेनिंग पूर्ण केले असून कु.सायली आढाव, कु.शुभांगी गोरे,कु.मानसी क्षीरसागर या विद्यार्थिनींची आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या कल्याण शाखेत व कांचन वाबळे या विद्यार्थिनी कोपरगाव शाखेत वरिष्ठ अधिकारी या पदावर नेमणूक करून या विद्यार्थिनी या ठिकाणी कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटात करण्यात आलेल्या ताळेबंदीमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. मात्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होवून या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. त्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे व संस्थेचे संचालक सदस्य तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी अभिनंदन केले आहे.