कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यामध्ये युरीयाची कृत्रिम टंचाई,प्रहारचा आंदोलनाचा इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील युरीया खताची कृत्रिम खताची टंचाई करुन गरज नसलेल्या खताची खरेदी करायला लावत लिंकिंग केली जात आसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या बाबत कृषी विभागाकडे तक्रार केली असुन कृत्रिम टंचाई व लिंकिंग बंद केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राज्यमंत्री बच्चु कडू याच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तरचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय गोविंदराव शिंदे यानी नुकताच दिला आहे.
कोपरगाव तालुका कृषी आधिकारी अशोक आढाव यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे,कोपरगाव शहर प्रमुख दिपक पटारे,तालुका संघटक नितिन तिपायले,महेश चव्हाण,तालुका अध्यक्ष संदीप श्रीरसागर,यांच्यासह पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.खरीपात शेतकऱ्यांची खते बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु आहे.शेतकऱ्याची नड पाहुन खत विक्रेते शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे.युरीया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करीत लिंकिंग करुन शेतकऱ्याना अन्य गरज नसलेली खते खरेदी करण्यास भाग पाडत आहे.कृषी खाते खते व बियाणे पुरेसे उपलब्ध असल्याचे सागत असताना असे प्रकार कोपरगाव व नगर जिल्ह्या मधे का घडत आहे ? असा प्रहारने उपस्थित केला आहे.खताची लिंकिंग थांबवावी व खताची उपलब्धता याची माहिती दर्शनी भागात विक्रेत्याना लावण्याबाबत सुचना द्याव्यात,शेतकऱ्याची खत विक्रेत्याकडुन होणारी पिळवणूक तातडीने थांबवावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी आपल्या निवेदनात शेवटी दिलेला आहे.