गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात बांधावर ट्रॅक्टर घातल्याचे कारणावरून महिलेस मारहाण,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या महिलेस शेजारचा आरोपी शेतकरी संजय शांताराम महाले हा काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला असता सदर महिलेने त्यास,”तू आपल्या सामायिक बांधावर ट्रॅक्टर का घातला” असा जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपी याने फिर्यादी महिलेस लोखंडी दांड्याने मारहाण करून दुखापत केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या बाबत आरोपी संजय महाले यानेही या फिर्यादी माहिला योगिता महाले विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.यात त्याने महिलेने याबाबत जाब विचारला असता आरोपीने,”हा नेहमीचा रस्ता आहे” असे उत्तर दिल्यावरही महिलेने आपल्याला लोखंडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करून दुखापत केली असल्याची फिर्याद दाखल केली आहे.दोघांनीही एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी यांचे बोलकी शिवारात जवळ-जवळ शेतजमीन आहे.त्यांचा एक बांध सामायिक आहे.त्या सामायिक बांधावर आरोपी संजय महाले याने ट्रॅक्टर घालून बांधाचे नूकसान केले आहे.त्या बाबत आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला असता सदर महिलेने त्याबाबत त्याला जाब विचारताना,तू,”आपल्या सामायिक बांधावर ट्रॅक्टर का घातला” असा जाबसाल केला असता त्याचा आरोपीस राग आला व त्याने फिर्यादी महिला योगिता नरेंद्र महाले (वय-३७) हिस लोखंडी दांड्याने मारहाण करून त्या महिलेस जखमी केले आहे.याबाबत फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी संजय महाले याचे विरुद्ध गु.र.क्रं.१३२/२०२१भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. आर.वाखुरे हे पुढील तपास करत आहेत.