जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चासनळीत चौदा हजारांची अवैध दारू पकडली,एकावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत चासनळी-कोळपेवाडी या मार्गालगत असलेल्या हॉटेल तारांगणच्या पाठीमागे आडोशाला एक इसम अवैध दारू विकत असल्याची खबर कोपरगाव तालुका पोलिसांना मिळाली त्यावरून तालुका पोलिसांनी शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान धाड टाकली असता त्यात आरोपी अमोल रोहिदास राक्षे (वय-24) रा.चासनळी हा इसम अवैध दारू विक्री करताना आढळून आला

पोलिसांनी त्याच्या ताब्यातील चौदा हजार एकशे बारा रुपये किमतीच्या दहा विविध कंपन्यांच्या क्वार्टर साईजच्या बाटल्या जप्त केल्या असून त्याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा र.नं.78/2019 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बी. बी,काशीद हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close