जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

खर्चास पैसे न दिल्याने एकास जबर मारहाण,आठ जणावर कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी खा.शंकरराव काळे यांच्या स्मारकाजवळ खर्च करण्यासाठी पैसे मागितले ते न दिल्याचा राग येऊन आरोपी गणेश संजय कोळपे, कुणाल संजय जाधव,सचिन अशोक शेरमाळे,राधाकृष्ण कोळपे,काळे कारखान्याच्या आसवणी प्रकल्पात काम करणारा बिल्लाभाई (पूर्ण नाव माहित नाही) ,रमेश शिंदे व त्यांचे सॊबत यांचेच वयाचे दोन अनोळखी इसम आदी आठ जणांनी आपल्याला हातातील फाईटने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची फिर्याद शाम ज्ञानदेव मंडलिक याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला खर्च करण्यासाठी पैसे मागितले मात्र आपल्याकडे रक्कम नसल्याने त्यातील आरोपी यांनी त्यांच्या हातातील फाईटने व लढा बुक्क्यांनी आपल्याला पोटात,तोंडावर,पाठीवर,मारहाण करून जखमी केले.शिवीगाळ करून आपल्याला जखमी केले.त्यानंतर आपण उपचारार्थ दवाखान्यात भरती झालो त्यामुळे जबाब देण्यास आपल्याला उशीर झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,शनिवार दि.21 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत वरील आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला खर्च करण्यासाठी पैसे मागितले मात्र आपल्याकडे रक्कम नसल्याने त्यातील आरोपी यांनी त्यांच्या हातातील फाईटने व लढा बुक्क्यांनी आपल्याला पोटात,तोंडावर,पाठीवर,मारहाण करून जखमी केले.शिवीगाळ करून आपल्याला जखमी केले.त्यानंतर आपण उपचारार्थ दवाखान्यात भरती झालो त्यामुळे जबाब देण्यास आपल्याला उशीर झाला आहे.दवाखान्यात भरती असताना आरोपीने लेखी जबाब दिल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा र.र.नं.138/2019भा.द.वि.कलम,325,323,504,506,143,147,149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close