आरोग्य
कोपरगाव तालुक्यात मृत्यूचे तांडव सुरूच !
न्यूजसेवाकोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही बाधित नागरिकांना तपासणीसाठी आवश्यक साहित्याचा मोठा अभाव दिसून येत आहे.याबाबत आता शहरात नगरसेवकांनी पुढाकार घेऊन वर्गणी क करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र आभाळच फाटल्यावर त्यांच्या ठिगळाला (प्रयत्नाला) मर्यादा येणार हि बाब उघड आहे.शहरात नगरपरिषदेला आता स्मशानभूमी कमी पडायला लागली असल्याने त्याचे विस्तारीकरण करण्याची तयारी करावी लागत आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ६४ हजार ३७९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २२ हजार ०७७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ४० हजार ३८९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ९१२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २६ दिवसात ७० जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.मात्र कोरोना तपासणीसाठी आवश्यक संच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बाधित रुग्णांची सर्व वाऱ्यावरील वरात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे कोरोना बाधित किती ? त्यांच्या संपर्कात आलेले किती.भरती किती? आणि खरे मृत्यू किती याचा कोणालाही काही मेळ लागण्याची चिन्हे सध्या तरी दिसून येत नाही.या बाबत तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर आदींची संपर्क साधला असता त्यांनी त्याला नेहमी प्रमाणे प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.