आरोग्य
कोपरगाव तालुक्यात दोन दिवसात सहा जणांचा जगास निरोप
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आजच्या सह दोन दिवसात नगर येथे ३५५ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ११३ अँटीजन तपासणीत ५२,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत १३४ असे एकूण अहवालात एकूण २९९ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २०० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर गत दोन दिवसात कोपरगाव तालुक्यातील सहा रुग्णांचे निधन झाले आहे.त्यात करंजी येथील ७८ वर्षीय,कोळपेवाडी येथील पुरुष वय-६६ वर्षीय पुरुष,कोपरगावातील लक्ष्मी नगर येथील ४५ वर्षीय महिला,५७,६२ वर्षीय पुरुष,माहेगाव मधील ६५ वर्षीय महिला आदींचा नागरिकांचा समावेश आहे.कोरोना मृत्यूचे तांडव आता गल्ली बोळात आता गोंधळ घालु लागले असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे त्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने आता कोरोनाने नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला सहाय्य करून नागरिकांना आपले प्राण वाचविण्यास मदत करावी लागणार आहे.अन्यथा हे मृत्यूचे तांडव थाम्बविणे अवघड जाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ५२ हजार ८२५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २४ हजार ३४३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख २६ हजार ७४१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ७४० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २२ दिवसात ५६ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.