पर्यटन व तीर्थक्षेत्र
शिर्डीत श्रीरामनवमी उत्सव सांगता संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतीनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दिनांक २० एप्रिल पासून सुरु असलेल्या श्रीरामनवमी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली आहे.
श्रीराम नवमी सांगता समारंभानिमित्त साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्यांची धर्मपत्नी वैशाली ठाकरे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली.यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. तर मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व त्यांची सुविद्य पत्नी प्रतिक्षा घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रीं ची पाद्यपुजा करण्यात आली आहे.
शिर्डीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम नवमी उत्सवावर विरजण पडले आहे.त्यामुळे साईबाबा आपल्या भक्तांना पारखे झाल्याचे दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर हा रामनवमी उत्सव नुकताच संपन्न झाला आहे.आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०६.३० वाजता संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्यांची धर्मपत्नी वैशाली ठाकरे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली.यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. तर मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व त्यांची सुविद्य पत्नी प्रतिक्षा घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रीं ची पाद्यपुजा करण्यात आली. सकाळी १०.०० वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर संस्थानचे मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर,संरक्षण अधिकारी पोलिस उपनिरिक्षक आण्णासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रीं ची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ०६.३० वाजता श्रीं ची धुपारती तर रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रीरामनवमी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन रुढी परंपरेनुसार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे,संरक्षण अधिकारी पोलिस उपनिरिक्षक आण्णासाहेब परदेशी,सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.