सण-उत्सव
डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.त्यांची जयंती लोहगावसह देशभर मोठ्या उत्सत साजरी करण्यात आली आहे.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे,माजी सरपंच गणेश चेचरे,भास्कर चेचरे,कृष्णा चेचरे,दत्तात्रय चेचरे,बळीराम चेचरे,बाळासाहेब चेचरे,अक्षय चेचरे, किरण चेचरे,सचिव आर.व्हि.चेचरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.