कोपरगाव तालुका
कोपरगावात अवैध कत्तलखाना सुरूच,नगराध्यक्षांचा कारवाईचा इशारा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगांव-(प्रतिनिधी)
संवत्सर मनाई वस्ती येथे स्वतंत्र कत्तलखाना उपलब्ध करूनही कोपरगाव शहरातील नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावरील संजयनगर उपनगरात अद्यापही अवैध कत्तलखाना सुरूच असल्याबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी संताप व्यक्त केला असून कडक कारवाईचा इशारा दिला आहे त्यामुळे अवैध कत्तलखाने सुरू ठेवणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे.
“संबंधित कसायांनी गोवंश हत्त्या बंद करून मनाई येथील कत्तल खान्याचा वापर करावा थकित जागा भाडे त्वरित भरावे.आरोग्य विभाग व मार्केट विभागाने दिलेल्या सुचना पाळा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल”-विजय वहाडणे, नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहरातील संजयनगर येथील बेकायदा कत्तलखाना शहराच्या आरोग्यासाठी हानिकारक होता. म्हणून औद्योगिक वसाहती जवळील संवत्सर ग्रामपंचायत हद्दइत”मनाई” येथे सोयीसुविधा युक्त कत्तलखाना “स्लॉटरहाऊस” कोपरगाव नगरपरिषदेने सुरू करून म्हैसवर्गीय जनावरे कत्तल करण्याची सोय करून दिलेली आहे.असे असतांनाही संजयनगर येथे बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत आहे.नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही असे प्रकार सुरू आहेत.याच कसाई वर्गाला विक्रीसाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेकांनी त्याचे भाडेही थकवलेले आहे.रात्री अपरात्री गोवंश कत्तल करून नगरपरिषदेच्या व शासनाच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सुरू आहे.संबंधितांना अनेकदा सांगूनही मनाई येथील अधिकृत कत्तलखान्याचा वापर होत नाही,दुकानांचे भाडेही थकविलेले आहे.गोवंश हत्त्या करून शहरवासीयांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे.रात्री अपरात्री बेकायदा कत्तल करून रक्त-मांस नाल्यात व नाल्यातून नदीत सोडल्याने सर्वांचेच आरोग्य धोक्यात आलेले आहे. संबंधित कसायांनी गोवंश हत्त्या बंद करून मनाई येथील कत्तल खान्याचा वापर करावा थकित जागा भाडे त्वरित भरावे.
आरोग्य विभाग व मार्केट विभागाने दिलेल्या नोटिसा-सुचना पाळा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. नागरिक, नगरपरिषद व शासनाचा अंत पाहू नका. सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. याआधी तुम्हाला सहकार्य करूनही तुम्ही असेच बेकायदा कृत्य करणार असाल तर ते कुणालाही परवडणारे नाही.नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोंबा मारून गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांमध्ये हिंमत असेल,शहरातील नागरिकांची-आरोग्याची-स्वच्छतेची काळजी असेल तर त्यांनी या विषयावरही तोंड उघडावे. सर्वकाही प्रशासनावर ढकलून देण्यापेक्षा सर्वांनीच या विषयावर आवाज उठविणे, सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासनाला स्थानिक लोकप्रतिनिधीनी सहकार्य करणे सर्वांच्याच हिताचे होईल.अशी कोपरखळी विरोधकांना शेवटी मारली आहे।