जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विस्थापितांसाठी शून्य कर्तृत्व असणाऱ्या माजी आ.कोल्हे विरुद्ध बोलायची हिंमत आहे का ?-सवाल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील अतिक्रमण हटवून आता बरोबर कालच दहा वर्ष उलटली असताना या दहावे वर्षात भाजपची सत्ता राज्य व केंद्रात,पालिकेत असताना काहीच कार्यवाही न करणाऱ्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या विरुद्ध एक चकार शब्द बोलण्याची शहरातील ‘त्या’ बेताल कार्यकर्त्यांची हिम्मत आहे का ? असा सवाल नरेंद्र मोदी मंचचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी विचारला आहे.

“विस्थापितांना फक्त नादी लावण्याचे काम वर्षानुवर्षे झाले.त्या नंतर बस स्थानकाचे काम भर चौकात झाले त्या वेळी चारही बाजूनी गाळ्यांसाठी जागा असताना शहाणपण का सुचले नाही ? काहीजण आपल्यालाच विस्थापितांची फार काळजी आहे असे दाखवित असतात.माजी आ.कोल्हे यांच्या कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्चीला हार घालण्याची धमक तुमच्यात आहे का ?-संजय कांबळे-माजी नगरसेवक,कोपरगाव पालिका.

कोपरगाव शहरात १० मार्च सन-२०११ रोजी शहरातील अतिक्रमणे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत हटविली.त्यात सुमारे दोन हजाराहुन अधिक नागरिकांची रोजी रोटी हिसकावली गेली त्या वेळेपासून हा प्रश्न प्रत्येक निवडणूक पाहून राजकीय नेते आपल्या मतपेट्या भरण्यासाठी वापरत आहे.मात्र कोणीही हा प्रश्न ऐरणीवर घेतला नाही.आता जवळपास सर्वच विस्थापित परागंदा झाले असताना ह विषय नगराध्यक्ष वहाडणे यांनी हातात घेतला असून गत २४ फेब्रुवारी रोजी व त्यानंतर पंधरा दिवसात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे.या पार्श्वभूमीवर कांबळे यांनी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”काल नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे शहराच्या हिताचेच कामासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तारखेला अहमदनगर येथे गेले होते.दहा वर्षांपासून विस्थापितांना न्याय मिळालेला नाही.अनेकजण विस्थापितांच्या प्रश्नावर केवळ प्रसिद्धीसाठी बातम्या-फोटो-गांधीगिरीचे उद्योग करत आहेत.खरे तर नगराध्यक्ष विजय वहाडणे हे गेल्याच महिन्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून आले.”फक्त नगरपरिषदेच्या नावावर असलेल्या जागेवरच खोका शॉप करता येतील” असे उत्तर शासनाने दिलेले आहे.हे माहित असूनही काहीजण आपल्यालाच विस्थापितांची फार काळजी आहे असे दाखवित असतात.माजी आ.कोल्हे यांच्या कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्चीला हार घालण्याची धमक तुमच्यात आहे का ? तुमच्यातील काहीजण तर कोल्हे यांच्या सतत संपर्कात असतात.विस्थापितांना फक्त नादी लावण्याचे काम वर्षानुवर्षे झाले.त्या नंतर बस स्थानकाचे काम भर चौकात झाले त्या वेळी चारही बाजूनी गाळ्यांसाठी जागा असताना शहाणपण का सुचले नाही ? या उलट नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मात्र शासनाकडे जाऊन सर्वांसमोर वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.नगरपरिषदेने आठ ठिकाणच्या जागा शासनास सुचविल्या,पण शासन त्याठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी देत नाही. केवळ बाजारतळ येथेच खोका शॉप होतील.काँग्रेस समितीजवळ खोका शॉपचा प्रस्ताव आहे.तेथेही काहीजण आडवे येताहेत.तरीही नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू आहेत.कृपया कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नये.किमान ज्यांना कायदे-नियम माहित अशांनी तरी भान ठेवावे.बातम्या-फोटो-मेसेजमुळे आपण लोकप्रिय होऊ हा गैरसमज काढून टाका.लोकशाहीमध्ये प्रत्येकास आंदोलन करण्याचा,टिका करण्याचा अधिकार आहे.पण काही भोळ्या विस्थापितांना सोबत घेऊन,आशेला लावून वेड्यात काढू नये.फक्त येणारी नगरपरिषद निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आंदोलने करू नका.हिंमत असेल तर बड्या नेत्यांविरुद्ध बोलून दाखवा.तांत्रिक पुर्तता होऊन बाजारतळ येथे खोका शॉप होणारच आहेत.पण ते आमच्यामुळेच होताहेत असा आव कुणीही आणू नये.असे आवाहन संजय कांबळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close