सण-उत्सव
कोपरगावात..या महिलेला नगराध्यक्ष बनण्याचा सन्मान
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान म्हणून कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे सूत्र एक दिवसासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्र.११ मधील नगरसेविका श्रीमती वर्षाताई हिरामण गंगुले यांचेकडे सुपूर्द केला असून हा नवीन पायंडा त्यांनी पाडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते.याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा असे ठरविण्यात आले होते.पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता.त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला तोच प्रघात पुढे पडला आहे.
ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते.याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा असे ठरविण्यात आले होते.पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता.त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.त्या दिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता.पण त्यानंतर ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला आहे.या दिवशी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान केला जातो.कोपरगावात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपले पदच महिला सुपूर्त करून नवीन पायंडा पडला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,जेष्ठ नगरसेवक भाजपा गटनेते रविंद्र पाठक,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल,मंदार पहाडे,नगरसेविका माधवी वाकचौरे,वर्षा शिंगाडे,हर्षा कांबळे,सुवर्णा सोनवणे,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,मेहमूद सय्यद,सुनील गंगुले सर्व महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
त्या वेळी नगराध्यक्ष वाहाडणे म्हणाले की,”प्रत्येकाने आधी स्वतःच्या घरातील महिला,कामवाली,धुणे भांडे करणाऱ्या,स्वच्छता कामगार यांच्याशी सन्मानपूर्वक वागावे व नंतर जागतिक महिला दिन साजरा करावा.राजमाता जिजाऊ माता,अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले यांचे गुणगान करणाऱ्या समाजात महिलांचे शोषण,बलात्कार होणे दुर्दैवीच आहे असेही शेवटी म्हणाले आहे.सर्व महिला नगरसेविका,अधिकारी,कर्मचाऱ्यांचा यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.