निधन वार्ता
ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांना पितृशोक

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वेस ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले व राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब गायकवाड यांचे पिताश्री मारुती दशरथ गायकवाड (वय-८५) यांचे नूकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक बहीण,एक भाऊ,एक मुलगा,चार मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.
स्व.मारुती गायकवाड यांची मंगळवार दि.२३ फेब्रुवारी रोजी एकादशी निमित्त भजन सुरु असतानाच रात्री ११.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.या अध्यात्मिक योगायोगाबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
स्व.मारुती गायकवाड हे अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावासाठी वेस-सोयगाव परिसरात परीचित होते.ते नाथपंथी भक्त म्हणून परिसरात चिरपरिचित होते.त्यांचा भजनीं मंडळात नेहमी सहवास असायचा.मंगळवार दि.२३ फेब्रुवारी रोजी एकादशी निमित्त भजन सुरु असतानाच रात्री ११.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.या अध्यात्मिक योगायोगाबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यांच्यावर वेस येथे अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.