आरोग्य
लायन्स डायलिसिस सेंटरचे उदघाटन उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असललेल्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे लायन्स डायलिसिस सेंटरचे उदघाटन लायन्स डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
या सेंटरमुळे गरजू रुग्णांना फायदा होणार असून आता त्यांना डायलिसिस उपचारासाठी बाहेर गावी जाण्याची गरज पडणार नाही. कोपरगाव येथेच अगदी सवलतीच्या दरात चांगले उपचार मिळणार आहेत- सत्येन मुंदडा
याप्रसंगी व्यासपीठावर ला.परमानंद शर्मा,आय.एम.ए.कोपरगावचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र गोंधळी,निमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन झवर, हॉस्पिटलचे संचालक चांगदेव कातकडे,प्रसाद कातकडे तसेच लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष सत्येन मुंदडा, लायन्स क्लब चे अध्यक्ष सुधीर डागा,लायनेस क्लबच्या अध्यक्षा किरण डागा, लिओ क्लबचे अध्यक्ष रोहित पटेल,डॉक्टर अभिजित आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर महेंद्र गोंधळी व डॉक्टर नितीन झंवर यांनी लायन्सच्या सेवा कार्याचे कौतुक केले व या डायलिसिस सेंटर ची उपयुक्तता सांगितली आहे.
लायन्सचे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात लायन्स लायनेस व लिवो क्लब कोपरगाव च्या सेवा कार्याचे खूप कौतुक केले व संपूर्ण प्रांतांमध्ये आम्ही लायन्स क्लब कोपरगाव कडे एक आदर्श व मार्गदर्शक क्लब म्हणून बघतो व असेच सेवा कार्य अविरतपणे पुढे चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी क्लबला केले आहे.
संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे संचालक कातकडे व हॉस्पिटल चे आभार सुधीरजी डागा यांनी मांडले व गरज पडल्यास आणखी एक डायलिसीस मशिन भेट देऊ असे सांगितले.
या प्रसंगी हॉस्पिटलच्या नेफरोलॉजिस्ट व टेक्निशियन यांचा सत्कार करण्यात आला.हे सेंटर कार्यान्वित करण्यासाठी सत्येन मुंदडा,सुधीर डागा,संदीप रोहमारे,तुलसीदास खुबानी,राजेश ठोळे,,अभिजीत आचार्य,डॉ.संजय उंबरकर यांनी परिश्रम घेतले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राम थोरे यांनी केले आहे.