गुन्हे विषयक
निवडून आलेल्या सदस्यांचे अतिक्रमण,कारवाईची मागणी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडनुकांना निकाल लागून अद्याप त्याची शाई वाळते न वाळते तोच विजयी उमेदवारांच्या तक्रारी सुरु झाल्याची घटना नुकतीच उघड झाली असून कोळगाव थडी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून विजयी झालेले उमेदवार अनिल रावसाहेब आंबेकर यांनी गावठाण हद्दीत त्यांच्या नावे असलेल्या जागे व्यतिरिक्त जास्त जागेत अतिक्रमण केले असल्याची तक्रार भाऊसाहेब नारायण पंडोरे यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केल्याने कोळगाव थडी परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार अनिल रावसाहेब आंबेकर हे विजयी झाले आहे.त्यांनी माझ्या गावाच्या गावठाण हद्दीत त्यांचे नावे असलेल्या जागे व्यतिरिक्त दुप्पट-तिप्पट जागेवर अतिक्रमण केले आहे.हि बाब सर्व उमेदवारांसह गावासही ज्ञात आहे.त्यामुळे याबाबत आपण शहानिशा करावी व हिबाब सत्य असले तर अनिल आंबेकर यांचे सदस्यत्व रद्द करावे.व प्रभाग क्रमांक दोन मध्ये मागास प्रवर्गा करिता राखीव असलेल्या प्रभागात पुन्हा निवडणूक घेण्यात यावी-भाऊसाहेब पंडोरे,तक्रारदार
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच मोठ्या धामधुमीत संपन्न झाली आहे.या निवडणुकीत अनेकांनी आपलेच घोडे पुढे गेल्याचे व शेमिगोंडा मिळवल्याच्या बढाया सुरु केल्या आहेत.त्याला सर्वच पक्ष जबाबदार असून कोपरगावातही नुकत्याच २९ ग्रामपंचायतींची निवडणूका संपन्न झाल्या आहेत.अशातच कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी हि ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्वाची गणली जाते.या ग्रामपंचायतीत नऊ सदस्य भाजपचे निवडून आले आहे.तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सपाटून पराभव झाला असल्याने गावातील पराभूत उमेदवार नाराज झाले असून त्यांनी विजयी उमेदवारांच्या आनंदात विरजण टाकण्याची संधी शोधली असली तर त्यात नवीन काही नाही.हा तालुक्यातील नेत्यांचा व गावोगावच्या राजकारण्यांचा राजमान्य शिरस्ता आहे.त्याला अनुसरूनच पराभूत उमेदवार भाऊसाहेब पंडोरे यांनी नुकताच तहसीलदार योगेश चंद्रे यांना एक निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”दि.१५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न झाली आहे. या निवडणुकीत नऊ सदस्य निवडणून आले आहे.त्यातील प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार अनिल रावसाहेब आंबेकर हे विजयी झाले आहे.त्यांनी माझ्या गावाच्या गावठाण हद्दीत त्यांचे नावे असलेल्या जागे व्यतिरिक्त दुप्पट-तिप्पट जागेवर अतिक्रमण केले आहे.हि बाब सर्व उमेदवारांसह गावासही ज्ञात आहे.त्यामुळे याबाबत आपण शहानिशा करावी व हिबाब सत्य असले तर अनिल आंबेकर यांचे सदस्यत्व रद्द करावे.व प्रभाग क्रमांक दोन मध्ये मागास प्रवर्गा करिता राखीव असलेल्या प्रभागात पुन्हा निवडणूक घेण्यात यावी.तो पर्यंत सरपंच आरक्षण सोडतीस स्थगिती देण्यात यावी.नवीन लोकनियुक्त कार्यकारिणी नियुक्त होईपर्यंत ग्रामविकास अधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्त करावे आदी मागण्या केल्या आहेत.
दरम्यान या घटनेने मळेगाव थडी परिसरात खळबळ उडाली आहे.त्यामुळे आता तहसीलदार काय भूमिका घेतात व निवडणूक लढवलेल्या सदस्यांचे सदस्यपद जाणार की राहणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.