कोपरगाव तालुकानिवडणूक
ग्रांमपंचायत निवडणुकीत विरोधकांची अनामत रक्कम जप्त करा-राजेश परजणे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर-( प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संवत्सर ग्रामपंचायतीच्या पंधरा जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांची अनामत रक्कम जप्त करून त्यांची जनमानसातील योग्यता दाखवून आपण विकास कामांबरोबर आहोत हे दाखवून द्यावे असे महत्वपूर्ण आवाहन आज गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
गावात दहशत कोण करते हे जनतेला माहित आहे.रस्ता लुटीत कोण सहभागी आहेत.हेही जनतेला माहिती आहे.मात्र त्यावेळी अण्णांचे नाव सांगताना यांना कमीपणा वाटत नसल्याचा त्यांनी टोला लगावला आहे.व बचत गटाच्या व बोगस बियांण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कोणी फसवणूक केली आहे याची नागरिकांना माहीत आहेत आमच्या तोंडून वदवून घेऊ नका असा इशारा दिला आहे व त्यावेळी त्यांनी रामसिंगबाबा मंदिराजवळ असलेल्या साखर कारखाना ऊसतोडणी मजुरांचा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावता येत नाही त्यामुळे गावात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे-राजेश परजणे अध्यक्ष गोदावरी-परजणे दूध संघ.
राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूकीचा प्रचाराच्या तोफा आज सांगता सभांनी थंडावल्या आहेत.व शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी निवडणूक संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे राज्यातील सर्वत्र आज सांगता सभा संपन्न झाल्या असून त्याला कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायती अपवाद नाही.त्यातले त्यात संवत्सर ग्रामपंचायत हि गत पंचवीस वर्षांपासून गोदावरी-नामदेवराव परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या ताब्यात असल्याने अनेकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.विशेषतः या निवडणुकीत प्रस्थापित काळे-कोल्हे या दोन्ही गटांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे.त्यामुळे या लढतीकडे तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी राजेश परजणे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाची प्रचार सभा आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास संपन्न झाली आहे.त्यावेळी ते उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे हे होते.
सदर प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,कृष्णराव परजणे,लक्ष्मणराव परजणे,माजी सरपंच विजय गायकवाड,केशवराव भाकरे,ज्ञानेश्वर कासार,बाबासाहेब परजणे,सोमनाथ निरगुडे,संभाजी भोसले,सूर्यभान परजणे,खंडू पा.फेफाळे,बाजार समितीचे संचालक भरत बोरणारे,औद्योगिक वसाहतीचे संचालक सोमनाथ निरगुडे,माजी उपसरपंच विवेक परजणे,मधुकर साबळे,निसार मौलाना,दिलीप ढेपले,कारभारी दैने आदींसह मोठ्या संख्येने नागरिक,महिला व मतदार उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आपण गेली पंचवीस वर्षाच्या कालखंडात जेष्ठ कार्यकर्ते व नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताची कामे केली आहे.त्यात ग्रामपंचायत कार्यालय असो की,समाजमंदिरे आपण सर्व नागरिकांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे.संवत्सर ग्रामपंचायतिची हि निवडणूक हि स्व.नामदेवराव परजणे यांच्या विचारांची निवडणूक आहे.या ग्रामपंचायतीत लक्ष्मणराव साबळे सारखे अण्णांच्या विचारावर निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे हा विकास साधता आला आहे.ग्रामपंचायत हद्दीत नऊ शाळा,अकरा अंगणवाड्याना इमारती बांधून देण्यात आल्या आहेत.संवत्सर मधील विद्यार्थ्यांना गत काही वर्षात शाळांनी दिलेल्या याद्यांप्रमाणे कोणताही भेदभाव न करता ७०८ सायकलींचे वाटप केले आहे.अनेक घरकुलांची जुन्या याद्याप्रमाणे कामे केली आहे.नवीन ०१ हजार ०७६ घरकुलांची कामे प्रस्तावित आहे.वाढदिवसाच्या निमित्त आपण स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना पुस्तके,शाळांत अभ्यासिका राज्यात सर्वात प्रथम उपलब्ध करून दिल्या आहे.गावात वेस बांधली आहे.गावात अध्यात्मिक,धार्मिक कार्यक्रम नेहमी सुरु ठेवले आहे.कांदा व भुसार मालासाठी उपबाजार लवकरच सुरु होईल.घनकचरा निर्मूलनात संवत्सर ग्रामपंचायतीचे नाव घातले आहे.विरोधकांच्या ताब्यात आलटून-पालटून बाजार समिती असताना यांनी तालुक्यातील अन्य मोठ्या गावात काय दिवे लावले आहेत.याचे प्रथम उत्तर देणे गरजेचे आहे.विरोधकांच्या ताब्यात आलटून-पालटून जवळपास साठ वर्ष विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती बाजार समिती आदींची सत्ता असूनही त्यांनी तालुक्यात काय कोणती विकासकामे केली याचा हिशेब देणे गरजेचे आहे.या बाबतीत त्यांच्याकडे काहीही उत्तर नाही मात्र आपल्यावर वैयक्तिक पातळीवर उतरून प्रचार सुरु आहे. त्या आरोपांचे आपण सामाजिक संकेतस्थळाचे स्क्रीन शॉट काढून ठेवले असून त्याचे कायदेशीर उत्तर देणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केल्याने अनेकांना घाम फुटला आहे.एखाद्या कामात पैसे काढण्याचा आमचा धंदा नाही तसे आमच्यावर संस्कार अण्णांनी केलेले नाही.आम्ही सार्वजनिक जीवनात वावरताना पैना-पैईचा हिशेब ठेवलेला आहे.तो कधीही दाखविण्याची आपली तयारी आहे.मात्र आरोप करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे नेमके गावांसाठी काय योगदान आहे हे त्यांनी प्रथम जाहीर करावे असे थेट आव्हानच त्यांनी आपल्या विरोधकांना दिले आहे.त्यांना शाळा बांधताना सार्वजनिक कामासाठी पैसा नव्हता आता यांचेकडे पैसा कोठून आला असा तिखट सवालही त्यांनी केला आहे.रेल्वेस्थानक,शेती महामंडळाची जमीन आदी प्रश्न आपण सोडविण्यास आपण प्रयत्नशील असून खा.डॉ.सुजय विखे व खा.लोखंडे यांचेकडे पाठपुरावा केला असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत मात्र आरोप करणाऱ्याकडे त्यांनी गावांसाठी नेमके काय केले आहे याचा एकतरी पुरावा द्यावा.कचरा डेपोच्या प्रश्न यांनी सोडावा यासाठी यांच्या ताब्यात नगरपरिषद असताना आपण अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र विरोधकांनी त्याकडे सातत्याने कानाडोळा केला आहे.शृंगेश्वर मंदिराचे काम केले दक्षिण भिंत राहिली मात्र उर्वरित काम आपण तीर्थक्षेत्र विकास योजनेत घेतले आहे.त्यावर विरोधकांनी आपले तोंड उघडण्यास भाग पाडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.विरोधकांनी केवळ ग्रामपंचायतीस कुलूप लावण्याचे पुण्यकर्म केले आहे.याबाबत आपण बिपिन कोल्हे यांचे लक्षवेधून घेतले मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने नाईलाजाने आपल्याला गुन्हा दाखल करावा लागला त्यांच्या नेत्यांनी लक्ष दिले असते तर आम्ही गुन्हे दाखल केले नसते त्याला तेच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी कोल्हे गटावर केला आहे.आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या आग्रहाखातर आलो होतो व विवेक परजणे हेही जनतेने आणले आहेत.व त्याला जेष्ठ नागरिकांचा समोरच त्यांनी दुजोरा घेतला व घराणेशाहीचा आरोप बिनबुडाचा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितलें आहे.गावात दहशत कोण करते हे जनतेला माहित आहे.रस्ता लुटीत कोण सहभागी आहेत.हेही जनतेला माहिती आहे.मात्र त्यावेळी अण्णांचे नाव सांगताना यांना कमीपणा वाटत नसल्याचा त्यांनी टोला लगावला आहे.व बचत गटाच्या व बोगस बियांण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कोणी फसवणूक केली आहे याची नागरिकांना माहीत आहेत आमच्या तोंडून वदवून घेऊ नका असा इशारा दिला आहे व त्यावेळी त्यांनी रामसिंगबाबा मंदिराजवळ असलेल्या साखर कारखाना ऊसतोडणी मजुरांचा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावता येत नाही त्यामुळे गावात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत असल्याचा आरोप केला व त्या ठिकाणी फिरते स्वच्छता गृह उभे करावे अशी मागणी केली आहे.भाषणाच्या शेवटी मतदारांना आवाहन करताना ते भावुक झाले होते व त्यांना अश्रू अनावर झाल्याने त्यांना आपले भाषण थांबवावे लागले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी केले त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रभागातील सर्व उमेदवारांचा परिचय करून दिला आहे.त्यावेळी उपस्थितांना,निसार मौलाना,दिलीप ढेपले,मधुकर साबळे,भरत बोरणारे,आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले आहे.उपस्थितांचे आभार सोमनाथ निरगुडे यांनी मानले आहे.