गुन्हे विषयक
कोपरगावात एकास किरकोळ कारणावरून ठार मारण्याचा प्रयत्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या सुभाषनगर येथील फिर्यादी किराणा दुकानदार अमीन हारून शेख याने भांडणात चापट मारल्याचा राग येऊन आरोपी मोहसीन मणियार (पूर्ण नाव माहीत नाही) रा.कोपरगाव याने त्याच्यावर स्क्रू ड्राइव्हरने थेट मानेवर हल्ला करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपी मोहसीन मणियार हा दारू पिऊन त्यांचे जवळ आला व फिर्यादी हारून शेख व त्याचा मित्र शुभम यांना शिवीगाळ करू लागला.याचा राग येऊन फिर्यादी याने आरोपीस एक चापट मारली त्याचा आरोपीस राग आला व त्याने हातात स्क्रू ड्रायव्हर घेऊन फिर्यादी अमीन शेख याचे मानेवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असर की,”फिर्यादी अमीन शेख याचे कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे किराणा दुकान आहे.फिर्यादी शेख व त्याचे अन्य चार मित्र हे दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धारणगाव रोडवरील माधव बागेसमोर बसलेले होते.त्यावेळी आरोपी मोहसीन मणियार हा दारू पिऊन त्यांचे जवळ आला व फिर्यादी हारून शेख व त्याचा मित्र शुभम यांना शिवीगाळ करू लागला.याचा राग येऊन फिर्यादी याने आरोपीस एक चापट मारली त्याचा आरोपीस राग आला व त्याने हातात स्क्रू ड्रायव्हर घेऊन फिर्यादी अमीन शेख याचे मानेवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्यास त्याच्या मित्रांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे तेथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.त्याबाबत फिर्यादी हारून शेख याने काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक व सहाय्यक फौजदार एस.सी.पवार यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी र.क्रं.८५८/२०२० भा.द.वि.कलम ३०७ अन्वयर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.