जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शहरातील मजले वाढीला संगणकीय अडथळा,ठेकेदारांत नाराजी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात पुर्वी छोट्या शहरात तिनमजली इमारती बांधण्याची परवानगी असल्याने त्यामुळे शहराच्या विकासाला अनेक अडथळे निर्माण होत होते.मात्र राज्य शासनाने छोटी शहरे मोठी करण्यासाठी व त्या शहरातील पालीकांना उत्पन्नाचे श्रोत वाढविण्यासाठी तिनमजली इमारती ऐवजी सोळा मजली इमारती बांधण्याची परवानगी जाहीर केली असली तरी या बहुमजली इमारत बांधण्याची रितसर मान्यता अजूनही संगणकीय प्रणालीत अडकल्याने बांधकाम व्यावसायीकांची पंचाईत झाल्याचे दिसून येत आहे.

निमशहरी भागात १६ मजली इमारती बांधकाम परवानगी शासनाने दिल्याने शहरात बहुमजली इमारती उभारणार त्यामुळे २५ टक्के उत्पन्न पालीकेचे वाढणार तर कमी जागेत अधिक बांधकाम होवून ज्यास्तीत ज्यास्त प्रशस्त घरे,शॉपिंग सेंटर होतील.कमी जागेत अधिक मोठ्या इमारती उभ्या राहील्यास शहराच्या वैभवात भर पडून शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे-प्रसाद नाईक,अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक संघटना,कोपरगाव.

शासनाने नुकतीच निमशहरी भागात मजले वाढीला परवानगी परवानगी दिली त्यामुळे ‘ब’ व ‘क’ वर्ग पालिका क्षेत्रातील ठेकेदार व बिल्डर व पालिका नगरसेवक पदाधिकारी आदींनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र पालीकेच्या कार्यक्षेत्रात हि नूतन प्रणाली संगणकावर दिसत नसल्याने ती योजना त्वरीत ऑफलाईन वर सुरू करावी अशी मागणी कोपरगाव क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.शुक्रवारी कोपरगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना कोपरगाव क्रेडाई संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रसाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष प्रसाद नाईक,उपाध्यक्ष,विलास खोंड सचिव चंद्रकांत कौले,खजिनदार हिरेन पापडेजा,दिनार कुदळे,राजेश ठोळे,यश लोहाडे,संदीप राहतेकर,सचिन बोरावके,आनंद आजमेरे,मनिष फुलफगर,प्रदिप मुंदडा,राहुल भारती,सिध्देश कपिले,आकुब शेख,जगदीश निळकंठ,किसनराव आसने,अक्षय जोशी आदींची उपस्थितीत होती.

यावेळी मुख्याधिकारी सरोदे यांच्याशी शहरातील बांधकामाच्या संदर्भातील विविध समस्यावर चर्चा करून नविन नियमाप्रमाणे बहुमजली इमारती बांधन्यासाठी परवानगी मिळावी तसेच इतर नियमावलीवर विचारविनिमय करावे अशी मागणी केली.या नविन नियमावलीमध्ये बहुमजली इमारती बांधण्याची परवानगी मिळाली असुन भविष्यात या नियमावलीमुळे सर्वांचा फायदा होणार आहे.पालीकेला उत्पन्न वाढणार आहे.बांधकाम परवाणगीचे करामध्ये मोठी वाढ होणार आहे.बांधकाम व्यावसायाला चालणाना मिळेल.बांधकाम व्यवसायाशी निगडीत असलेले कारागीर,मजूर,इतर व्यावसायीक यांच्या उदरनिर्वाहाच्या समस्या मिटण्यास मदत होणार आहे तेव्हा पालीका प्रशासनाने एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अर्थात यु.डी.सी.पी.आर प्रणाली त्वरीत सुरु करावी.जर ही नियमावली सुरू करण्यास विलंब झाला तर बांधकाम व्यवसायीक व त्यांच्यावर विसंबून असलेल्या इतर व्यावसायीकांसह मजूरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असेही शेवटी प्रसाद नाईक म्हणाले आहे.दरम्यान मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी क्रेडाई संघटनेचे निवेदन स्विकारुन त्वरीत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close