कोपरगाव तालुका
आगामी पंतप्रधान शरद पवार व्हावे-आ.काळेंचा आशावाद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या शिदोरीवर तीन पक्षांना एकत्रित आणून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करून राज्यातील जनतेला विश्वास दिला असून त्यांच्या या नेतृत्वातून आज त्यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद देण्याबाबत प्रमुख विरोधी पक्षामध्ये हालचाली सुरु आहे.देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता शरद पवार यांच्याकडे असून २०२४ च्या निवडणुकीत पवार हे देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावे असा आशावाद कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
इ.स.१९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला.येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले-आ.आशुतोष काळे
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात आभासी सभेचे थेट प्रक्षेपण कृष्णाई मंगल कार्यालयात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कर्मवीर कारखाण्याचे जेष्ठ संचालक,माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे,
पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कारभारी आगवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर डडियाल, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, सुनील साळुंके, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलम शेख,भरत मोरे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा स्वप्नजा वाबळे, शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,महिला युवती अध्यक्षा नगरसेविका माधवी वाकचौरे,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,फकीर कुरेशी, कृष्णा आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद,सुधाकर दंडवते,सोनाली साबळे,सोनाली रोहमारे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,अनिल कदम,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, सचिन रोहमारे, संजय आगवण,सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे,सुनील शिंदे आदी मान्यवरांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले त्यानंतर त्यांनी मागे फिरून पाहिले नाही.पवार हे विचारांचा महासागर आहे.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच झटत असतात.त्यांचे विचार माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा देऊन उत्साह वाढवीत असतात.कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरुपातील खोदकाम पूर्ण होण्यामागे पवार यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांच्याकडे ज्या ज्यावेळी मतदार संघातील विकासकामांचे प्रश्न घेवून गेलो त्या-त्यावेळी त्यांनी त्याबाबत तातडीने मार्ग काढले आहे.त्यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष असून भविष्यात पवार यांच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करून त्यांना शतायुष्य लाभावे व २०२४ ला या देशाचे पंतप्रधान म्हणून पवार यांनी विराजमान व्हावे असा आशावाद व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले.कारभारी आगवण,काका कोयटे,शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडीयाल,कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.