जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील..इतक्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना कोपरगाव पंचायत समितीने केलेल्या पाठपुराव्यातून ‘ब’ यादीतील पात्र लाभार्थ्यांना १३३३ घरकुल मंजूर करण्यात आले आहे.या लाभार्थ्यांचे कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत स्तरावर महाआवास अभियानाचे आयोजन केले असून या अभियानाचा ‘ब’ यादीतील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सभापती पोर्णिमा जगधने यांनी नुकतेच केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन-१९९५-९६ पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर-कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते.लाभार्थ्यांच्या ०.९५ लाखांचे अनुदान ग्रामीण भागात दिले जाते.

सन-२०२२ पर्यंत स्वत:चे घर नसलेल्या सर्वच नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.२० नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय आवास दिन’ म्हणून साजरा केला जातो.ग्रामीण भागात गृहनिर्माणाचे काम गतीमान करणे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे हा यामागील उद्देश आहे.या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधत महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत स्तरावर २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १०० दिवसीय महाआवास अभियानाचे आयोजन केले आहे.या अभियानाच्या माध्यमातून ‘ब’ गटाच्या घरकुल लाभार्थी यादीतील पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची एकाच वेळी पूर्तता करून घेण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने मंजुरी देण्यात येणार आहे.तसेच प्रथम हफ्ता वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे नियोजन या अभियानातून केले जाणार आहे. हे अभियान ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे मार्फत राबविले जाणार असून यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.गरजू पात्र लाभार्थ्यांना सहजपणे घरकुलाचा लाभ मिळावा व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये येण्याची गरज भासू नये हा महाविकास आघाडी सरकार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा उद्देश आहे.सर्व लाभार्थ्यांची एकाचवेळी कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी हे अभियान राबविले जात असून ब’ यादीतील पात्र लाभार्थ्यांनि या अभियानाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सभापती जगधने व उपसभापती अर्जुन काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close