निधन वार्ता
गंगुबाई जाधव यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील रहिवाशी महिला व नंदकिशोर जाधव यांच्या मातोश्री गंगुबाई रामनाथ जाधव (वय-७२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे गोदावरी तीरी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.गंगुबाई जाधव या धार्मिक व सहिष्णू म्हणून प्रसिद्ध होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या प्रपंचाचा सर्व भार आपल्या खांद्यावर पेलला होता.अनेक दिवसापासून दीर्घ आजाराने त्रस्त होत्या मात्र त्यांच्यावर कोपरगावात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला असता त्यांचे निधन झाले आहे.
स्व.गंगुबाई जाधव या धार्मिक व सहिष्णू म्हणून प्रसिद्ध होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या प्रपंचाचा सर्व भार आपल्या खांद्यावर पेलला होता.अनेक दिवसापासून दीर्घ आजाराने त्रस्त होत्या मात्र त्यांच्यावर कोपरगावात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला असता त्या रुग्णालयातच कोसळल्या त्यावेळी त्यांचे नातेवाईकही जवळ होते.त्यांच्यावर कोपरगाव येथे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्या वेळी त्यांच्या निधनाने अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.