जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

..या तालुक्यात रब्बीची २३.७२ टक्के पेरणी पूर्ण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दि.१ जून ते २६ जून कालावधीमधील राज्यातील सरासरी पाऊस १०६३.८ मि.मी. असून दि.२६ ऑक्टोबर पर्यंत १२१७.६मि.मी.म्हणजेच सरासरीच्या ११४.४६ टक्के पाऊस झाला.मागील वर्षी दि.२६ आक्टोबर २०१९ अखेर १३२७.३ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या १२४.७७ टक्के पाऊस झाला आहे.या पावसामुळे कोपरगाव तालुक्यात ज्वारी,गहू,मका,हरभरा,आदी प्रमुख पिकांसह उसाचे क्षेत्र धरून एकूण २९ हजार ४०० क्षेत्रापैकी ०६ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच २३.७२ टक्केक्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

राज्यात दि.१ जून ते २६ जून २०२० अखेरीस सरासरीच्या तूलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.राज्यात दि.२६ ऑक्टोबर २०२० अखेर पर्जन्यमान सरासरीच्या तूलनेत एकूण ३५५ तालूक्यांपैकी पैकी एक तालूक्यांत २५ ते ५० %, १९ तालूक्यात ५० ते ७५ %, ७१ तालूक्यात ७५ ते १००% तर २६४ तालूक्यात १०० % पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.खरीप हंगाम २०२०-२१ पिक पेरणी (दि.१९ ऑक्टोबर २०२० अखेर ) राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) १४१.९८ लाख हेक्टर असून दि.१९ ऑक्टोबर २०२० अखेर १४५.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर (१०२.४६ %) पेरणी झाली आहे. तसेच राज्यात खरीप पिकांचे ऊस पिकांसह सरासरी क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर असून १४७.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९७.५६ %) पेरणी-लागवड झाली आहे.मागील वर्षी दि.०४ नोव्हेम्बर २०१९ रोजी संपणाऱ्या सप्ताहा अखेर राज्यातील ऊस पिकासह पेरणी क्षेत्र १४२.६२ लाख हे. (९४.२४%) तर ऊस पीक वगळून पेरणी क्षेत्र १४१.३९ लाख हे. (९९.५८ %) होते.
कोपरगाव तालुक्यात पुढे सरासरी क्षेत्र पेरलेले क्षेत्र व त्यापुढे त्या पिकाची टक्केवारी दर्शवली आहे.ज्वारी ३७५७.६४-४३२.७०-१२ %,गहू ५६६०.०२-४६९.५०-०८ %,मका ६३२.३८-७३०.००-११५ %, एकूण रब्बी तृण धान्य १००५०.०४-१६३२.२०-१६%, हरभरा ६६७६.९१-६६६.००-११ %, एकूण रब्बी अन्नधान्य-१६७२६.९५-२३९५.२०-१४ %, करडई-९.००, एकूण रब्बी गळीतधान्य-९.००, एकूण रब्बी हंगाम-१६७३५.९५-२३९५.२०-१४ %,

ऊस आडसाली-८००.००-५६३.३७-७० %, ऊस पूर्व हंगाम-१४००.००-९.४०-१ %, ऊस सुरु-१६००.००, एकूण ऊस लागवड-३८००-५७२.७७-१५ %, ऊस खोडवा-२३००.००, एकूण ऊस क्षेत्र-६१००-५७२.७७-९ %, चारा पिके-३५००-६८३.२०-२० %, भाजीपाला पिके-१५००-९०७-६० %, मसाला पिके-५०, औषधी व सुगंधी वनस्पती पिके-५.००, फुलपिके-१०.००, फळपिके-१५००-२४१४.५४-१६१ %, एकूण-२९४००.९५-६९७२.७१-२३.७२ %रब्बी पिकांची पेरणी झाली असल्याचेही तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शेवटी दिली आहे.या पुढे अद्याप आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close