जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात ०.५८ लाखांची लूट,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील महिला मोना रवींद्र जेधे (वय-२८) या आपल्या दोन मुलांना घेऊन कोपरगाव शहरात खरेदी साठी आल्या असता त्यांच्या बाजाराच्या पिशवीत पाकिटात ठेवलेली सोन्याची दीड तोळ्याची सोन्याची पोत,रोख रक्कम व ए.टी.एम.कार्ड असा ५८ हजारांचा ऐवज सराफ बाजार ते कापड बाजार या दरम्यान एका अनोळखी महिलेने लुटून नेला आहे.त्यामुळे खळबळ उडाली असून या बाबत फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दिवाळीचा सण जवळ आल्याचा गर्दीचा फायदा घेण्यासाठी काही गुन्हेगार प्रवुर्तीच्या महिला गर्दीत बाजारकरू माहिलांच्या अंगावर येऊन त्यांना धक्का लागल्याचे निमित्त करून पिशवीतील अथवा हातातील वस्तू लाम्बवित असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.नेमकी या घटनेची पुनरावृत्ती नुकतीच शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली आहे.

गत सात महिने कोरोना साथीमुळे खरेदी बंद असल्याने व आता दिवाळीचा सण जवळ आला असल्याने आता खरेदी साठी नागरिकांची झुंबड उडू लागली आहे.या गर्दीचा फायदा घेण्यासाठी काही गुन्हेगार प्रवुर्तीच्या महिला गर्दीत बाजारकरू माहिलांच्या अंगावर येऊन त्यांना धक्का लागल्याचे निमित्त करून पिशवीतील अथवा हातातील वस्तू लाम्बवित असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.नेमकी या घटनेची पुनरावृत्ती नुकतीच शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली आहे.फिर्यादी महिला हि आपल्या दोन मुलांना घेऊन काही वस्तुंची खरेदी करत असताना त्यांनी आपल्या वस्तूंसाठी एक पिशवी हातात बाळगली होती.हातात दोन मुले असल्याने त्यांच्याकडे लक्ष ठेऊन व पाळतीवर असलेल्या काही महिलांनी त्यांना धक्का देण्याचा बहाणा करुण त्यांच्या पिशवीत ठेवलेले दीड तोळा सोन्याची पोत,रोख रक्कम,सेंट्रल बँकेचे एक ए.टी.एम.कार्ड,आधार कार्ड पास पोर्ट साइजचे फोटो असा ऐवज लाम्बवला आहे.फिर्यादी महिलेने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात महिलेच्या विरुद्ध गु.क्रं.८०४/२०२० भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात माहिले विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close