कोपरगाव तालुका
क्रीडा संकुल पळविणारेच त्याबाबत प्रश्न करतात हा मोठा विनोद-टीका
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याचे हक्काचे क्रीडासंकुल पळविणारेच आज क्रीडांगणासाठीची राखीव जागेबाबत कंठघोष करू लागले आहे त्यामुळे आता त्यांना एखाद्या विनोद वीरांचा पुरस्कार शोधावा लागेल अशी उपरोधिक टीका कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
निवडणुकीत जय पराजय होत असतो.या आधी सहकारातील कोट्यावधी रुपये उधळूनही माजी आ.कोल्हे यांचा विधानपरिषद तर २००४,ची निवडणूक,बिपीन कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीत दोनदा व गत निवडणुकीत ज्या माजी आमदारांचा पराभव झालेलाच आहे.त्याचा सल्ला घेतला असता तर हि दुर्बुद्धी झाली नसती.आरोप करणारे इतके महान असतील तर तुमच्या कारखान्यावर २०० कोटी रुपयांचा तोटा ही कुणाच्या कर्तृत्वाची पावती आहे ?-नगराध्यक्ष विजय वहाडणे
कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेने गत चार वर्षात विकास कामे केली नसल्याचा नुकताच आरोप केला आहे.त्यामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे मानले जात आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून या कोल्हे यांच्या टिकेस उत्तर देताना ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आपल्याला मान्य आहे.आपल्याला कमी मते पडली हेही मान्य आहे.तरीही पराभवामुळे आपण खचून न जाता शहराची विकास कामे इमानेइतबारे करत आहोत.मात्र पराभूत ताईंच्या लोकप्रिय पुत्राने आधी सांगावे की,२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला असलेले तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले ? शेकडो कोटी रुपये निधी आणल्याचे कंठघोष करून सांगता,पण कुणाला किती कोटी रुपये दलाली मिळाली हे सांगितले असते तर नागरिकांचे अज्ञान दूर झाले असते व त्यांना खरी किती माया मिळाली याची माहिती मिळाली असती. आपण छातीठोकपणे सांगतो कि नगराध्यक्ष व्हायच्या आधी दहा वर्षात झाली नाहीत इतकी कामे हे पद मिळाल्यापासून साडेतीन वर्षात केली आहेत.शहराच्या प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व जनतेला ती कामे माहिती आहेत.तुम्ही आमदार असतांना व आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही.कारभारात अडथळे आणले,पाच क्रमांकाचा साठवण तलाव व्हावा म्हणून आपण दिल्लीपासून प्रयत्न करत होतो पण तुम्ही अडथळेच आणण्याचे काम मनोभावे केले आहे.नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा अडथळे तुम्हीच आणले.क्रीडांगणासाठीची राखीव जागा घ्यायचा प्रयत्न का केला नाही असा सवाल विचारणाऱ्यानीं नगरपरिषदेची आर्थिक कुवत नसतांना शहरात अजूनही असलेल्या अनेक आरक्षित जागा घ्यायचे ठरवले तर किती कोटी रुपये लागतील याचे भान ठेवले असते तर बरे वाटले असते.एकीकडे नगरपरिषदेला निधी मिळू द्यायचा नाही.पण दुसरीकडे नगरपरिषदेच्या विरुद्ध बातम्या पेरायच्या हि दुतोंडी गांडुळछाप नीती बंद करा.नविन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेला कोणी हाकलून लावले ? त्याच निसर्ग कॅन्सल्टन्सी संस्थेने आता वसुलीसाठी नगरपरिषदेवर दावा ठोकला आहे.निकाल विरोधात गेला तर होणारे प्रचंड आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण ? तुमच्यातील कुणी किती पैसे त्या योजनेच्या ठेकेदाराकडून उकळले याचा शोध घेतला असता तर जनतेला बरे वाटले असते.मुख्य जल वाहिणीवर नळजोड घेऊन प्रचंड पाणी वापरणारे पाणीचोर कोणाच्या भोवती घुमत आहेत.तुमच्यात धमक असेल तर त्या चेल्याचें मुख्य जलवाहिणीवरील नळजोड तोडण्याची धमक दाखवावी.सर्वसाधारण सभा किती झाल्या याचा हिशोब ठेवण्यापेक्षा शहरात झालेल्या विकासकामांचा हिशोब केला असता ते बरे वाटले असते.तुमच्या गटाच्या ताब्यात सत्ता असतांना तुम्ही करून ठेवलेले घोळ निस्तारण्यातच अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे.नगरसेवकांना पुढे करून दररोज काहींना माहिती मिळविण्यासाठी अर्ज करून तुम्ही नाहक वेळ घेता आहात.तुमचे काही नगरसेवक ठेकेदारांना दमबाजी करून भागीदारी करीत आहेत. त्या कामांचे बिल द्या असे मला आजही सांगताहेत.त्याबद्दल बोलले असते तर रस्त्यांची कामे अधिक वेगाने करून त्यांची प्रत वाढवता आली असती.शहरातील हेम मेडिकल ते एस.जी.विद्यालय रस्ता,धारणगाव रस्ता,गुरुद्वारा रोड,छत्रपती संभाजी महाराज चौक ते इंदिरा पथ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा,खोका शॉप आदी कामे लवकरच पूर्णत्वास जात आहेत.त्यावर कार्यवाही सुरू असतांना मिटिंग ऐकूच येत नाही असे झोपेचे सोंग कोण घेत आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
डॉ.आंबेडकर मैदानाचे व अनेक रस्त्याच्या कामाचे कार्यदेश दिलेले आहेत.पावसाळ्यामुळे कामे थांबलेली आहेत.कोणाच्या जवळचे अनेक ठेकेदार आहेत. त्यांना विचारा शहरात किती कामे झाली.अनेक वर्षे नगरपरिषद ताब्यात असतांना काही करायचे नाही व सत्ता हातातून गेल्यावर बोंब मारायची हे डावपेच आता कालबाह्य झाले आहे.नगरपरिषदेत नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळते.कोपरगाव नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर पश्चिम विभागात मध्ये अठरावा क्रमांक आला आहे मात्र हि बाब महाभारतातील गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधणारांना दिसणार नाही.तुमच्या काळात साठवण तलावातील मासे पकडण्याचा ठेका वार्षिक फक्त ०१ लाख ६ हजार रुपयांना दिला होता.आता तोच ठेका वार्षिक १४ लाख १४ हजार रुपयांना दिला.कमी पैशात मासे पकडण्याचा ठेका देऊन पाच वर्षात नगरपरिषदेचे किमान ६० लाख रुपये उत्पन्न तुमच्याच काळात बुडवले आहे.हि रक्कम कुणाच्या खिशात गेली हे पाणी चोरांना दिसणार नाही हे उघड आहे.पाकिटवाले-टाळ्या पिटणारे गोळा करून भाषणे ठोकून समाधान मिळवू नका.माजी मंत्री कोल्हे यांचा सल्ला घेतला असता तर फार बरे झाले असते.बहुमताचा वापर करून खोका शॉप,रस्त्यांची कामे यात तुम्हीच अडथळे आणत आहात हे जनता जाणून आहे.शहरात खोका शॉप व्हावीत यासाठी तुम्ही काय दिवे लावले होते.नगरपरिषदेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकिय खटपटी सुरू केलेल्या आहेत.चेलेचपाटे पुढे करून निवडणुकीपर्यंत तुमचे चाळे वाढत जाणार आहेत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.सहकारी कारखान्यावर दोनशे कोटींचे कर्जाचा डोंगर कोणामुळे झाला आहे.सहकारी कारखान्याला पुरवठा करणारे पुरवठ्याचे ठेकेदार कोण आहे ? हे बोलायला भाग पाडू नका असा इशाराही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.